GK: जगातील एकमेव खेळाडू ज्याने 50 पेक्षा कमी चेंडूंमध्ये 3 वेळा ठोकले शतक, नाव सांगू शकता का? – Marathi News | Do you know the only cricketer to score three ODI centuries in fewer than 50 balls


दिवसेंदिवस क्रिकेट प्रेमींची संख्या वाढतच चालली आहे. अनेक सामने पाहण्यासाठी चाहते जगभर फिरताना दिसतात. तसेच खेळाडूंनी केलेले रेकॉर्ड्स देखील अनेकांच्या लक्षात असतात. पण तुम्हाला एक असा खेळाडू माहिती आहे का? ज्याने 50 चेंडूंमध्ये तीन शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीने सर्वत्र खळबळ माजली होती. आता हा खेळाडू कोण आहे? जाणून घ्या…

वनडे सामन्यातील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना डिव्हिलियर्सने अशी तूफानी खेळी केली की त्याचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकलेला नाही. त्याने केवळ ३१ चेंडूंत शतक ठोकून जागतिक विक्रम रचला होता. मात्र असा एक फलंदाजही आहे ज्याने असाच पराक्रम ३ वेळा केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये जोस बटलरने ५० चेंडूंच्या आत तीन वेळा शतक ठोकले आहे. वर्ष २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळताना बटलरने फक्त ४७ चेंडूंत शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याच्या नावे हा रेकॉर्ड होता.

डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड आजही कायम

वनडेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड आफ्रिकेच्या स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने जोहान्सबर्ग येथे १८ जानेवारी २०१५ रोजी वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना फक्त ३१ चेंडूंत शतक पूर्ण केले होते. त्या सामन्यात डिव्हिलियर्सने ४४ चेंडू खेळले होते आणि त्यात त्यांनी १४९ धावा केल्या होत्या. यात १६ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. हा रेकॉर्ड आजही कोणत्याही फलंदाजासाठी स्वप्न आहे.

सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज

५० चेंडूंत सर्वाधिक शतके ठोकण्याचा रेकॉर्ड आजही जोस बटलरच्या नावावर आहे. बटलरने दुबईत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या २०१५ च्या सामन्यात ४६ चेंडूंत शतक ठोकले होते. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध साउथहॅम्प्टनमध्ये त्याच्या फलंदाजीचा झंझावात सुरू झाला ज्यामुळे केवळ ५० चेंडूंत त्याने शतक पूर्ण केले. तिसरा रेकॉर्ड त्याने नेदरलँड्सविरुद्ध केला होता. त्याने त्या सामन्यात ४७ चेंडूंतच शतक पूर्ण केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *