Dhamaal 4 OTT: थिएटरनंतर आता OTTवर ‘धमाल 4’चा तडका; कधी अन् कुठे पाहता येणार कॉमेडीचा फुल ऑन धमाका?


Ajay Devgans Dhamaal 4 OTT Release: अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत कॉमेडी फिल्म (Comedy Movie) ‘धमाल 4’ (Dhamaal 4) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  सिनेमागृहात प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहात प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर ‘धमाल 4’ हा सिनेमा रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  10 जुलै 2026 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘धमाल 4’  या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला.   जर, तुम्ही ‘धमाल 4’ हा सिनेमा चित्रपटगृहात पाहू शकला नाहीत, तर तुम्ही हा सिनेमा नक्कीच घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.  घरबसल्या आपण कॉमेडी थ्रिलर सिनेमा ‘धमाल 4’ चा आनंद घेऊ शकता. दरम्यान, ‘धमाल 4’ हा सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? पाहूयात.

‘धमाल 4’ या कॉमेडी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची डेट समोर आली आहे.  123  तेलुगु रिपोर्ट्सनुसार, इंद्र कुमार दिग्दर्शित  हा सिनेमा  4 सप्टेंबर 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ‘धमाल 4’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.   ‘धमाल 4’ हा कॉमेडी चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला होता. आठ आठवडे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  आता हा कॉमेडी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  दरम्यान, आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की,  सिनेमागृहात जरी या सिनेमाने चांगली कामगिरी केली असली तरी,  ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘धमाल 4’ हा सिनेमा ट्रेडिंगवर येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘धमाल 4’ या कॉमेडी चित्रपटाने किती कोटींचे कलेक्शन केले? (Ajay Devgan And Riteish Deshmukhs Comedy Film Dhamaal 4)

कमाईच्या बाबतीत ‘धमाल 4’ या कॉमेडी चित्रपटाने अनेक हिट सिनेमांचं रेकॉर्ड मोडलं.  रिपोर्ट्सनुसार,   आतापर्यंतच्या फ्रँचायझीमधील ‘धमाल 4’ हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  या कॉमेडी चित्रपटाने वर्ल्डवाईड 230.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.  तसेच 2026च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत ‘धमाल 4’  या सिनेमाने आपले स्थान निर्माण केले आहे. ओपनिंग डेपासून ‘धमाल 4’ या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित या सिनेमाचे, अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया,  आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे.  या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त,  रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रवि किशन, संजय  मिश्रा, उपेंद्र लिमये,  अंजली आनंद, संजीदा शेख, ईशा गुप्ता यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bollywood Actress Manisha Koirala Cancer: ‘मृत्यू माझ्या जवळ…’, कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर असताना ‘दिल से’ फेम बॉलिवूड अभिनेत्री खचली, म्हणाली, ‘असं वाटलं सगळं संपलं’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *