Bigg Boss 20 First Captain Yung DSA: ‘बिग बॉस सिझन 20’ (Bigg Boss 20) मधील सदस्यांनी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. 16 सदस्यांनी ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरात एन्ट्री घेत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरात सध्या स्पर्धकांना टास्क दिले जात आहे. पहिल्याच आठवड्यात 4 स्पर्धक नॉमिनेट (Nominate) झाले आहेत. दरम्यान, कोणता स्पर्धक घरातून बाद होणार, हे लवकरच उघड होईल. दरम्यान, एलिमिनेशनपूर्वी ‘बिग बॉस सिझन 20’च्या घराला आणि सदस्यांना पहिला कॅप्टन मिळाला आहे. कॅप्टन नेमका आहे तरी कोण? कोणत्या स्पर्धकाने (Yung DSA) हातात सुत्रे घेतली आहे? पाहूयात.
Yung DSA बनला ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन (Yung DSA Becomes First Captain of Bigg Boss 20)
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रचंड राडा झाला होता. तिघांमध्ये कॅप्टन्सीसाठी चुरशीची लढत रंगली होती. कॅप्टन्सीसाठी गुल्लू, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यात लढत रंगली होती. दरम्यान, तिघांमधून ‘बिग बॉस सिझन 20’ चा पहिला कॅप्टन यंग डीएसए बनला आहे, अशी माहिती समोर आली आहे. ‘Viral Bhayani’ या इन्स्टाग्राम पेजनुसार, हर्ष मचारे उर्फ यंग डीएसए हा ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरातील पहिला कॅप्टन बनला आहे. ‘घरात कॅप्टनसीच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे!’, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कॅप्टन्सीसाठी तीन उमेदवार ठरलेले असतात. इतर सदस्यांना टास्क दिला जातो. पॉपकॉर्न बकेटमध्ये पॉपकॉर्न गोळा करायचे, तसेच कॅप्टन्सीसाठी उभे असलेल्या तिघांपैकी एकाच्या बकेटमध्ये टाकायचे. याचा एक प्रोमोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये काझी आणि आसिफ यांच्यात भांडण झालं असल्याचं पाहायला मिळालं. दोघांमधील परिस्थिती अधिक चिघळू लागते. दोघांनीही इतर स्पर्धक शांत करण्याचा प्रयत्न करतात. आसिफला स्काऊट शांत राहण्यासाठी सांगतो. दरम्यान, या भांडणाचा निकाल ‘विकेंट का वार’मध्ये लागणार एवढं मात्र नक्की. ‘विकेंट का वार’मध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या आठवड्यात एकूण 4 स्पर्धकांना इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त व्होट्स मिळाले. त्यामुळे या चार सदस्यांवर एलिमिनेशची टांगती तलवार आहे. लव गिल, उदिती सिंह, अरिशफा खान आणि कनिका मान यांपैकी एका स्पर्धकाला कमी व्होट मिळाल्यामुळे घरातून बेघर व्हावं लागू शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या: