Bachchu Kadu: दिवाळीत राज्यात खांदेपालट होणार; बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


Bachchu Kadu: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य खांदेपालटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिल्याचेही कडू यांनी म्हटले आहे. याचवेळी जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी स्पष्ट मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

जळगाव जिल्ह्यातून किशोर आप्पांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे. हवे तर जिल्ह्यात दोन मंत्रिपदे ठेवा, पण आप्पांना मंत्री करा, बच्चू असे कडू यांनी म्हटले. किशोर पाटील हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत असून, त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील जनतेला त्यांना मंत्रिपद मिळावे असे वाटणे स्वाभाविक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जोर लावणार का, असा प्रश्न विचारला असता, “जर ‘जोर’ या शब्दाला काही किंमत असेल आणि त्या जोरावर मंत्रिपद मिळत असेल, तर आम्ही नक्कीच तो जोर लावू,” असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु- (Eknath Shinde is displeased with two ministers)

एकनाथ शिंदे नाराज असलेल्या दोन्ही मंत्र्यांकडे महत्वाची मंत्रीपद असताना त्यांना राज्यभरात चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निकालानंतर शिंदेकडून आता अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. येणाऱ्या काही दिवसांत शिंदे मंत्रिमंडळात बदल करून नव्या व पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रीपदाची धुरा देण्याची शक्यता आहे. यासाठी काही इच्छुक शिंदेकडे लॉबिंग ही करत असल्याचे कळते. आता शिंदे सेनेच्या मंत्री मंडळात कोणाला लॉटरी लागते आणि कोणाचा पत्ता कट होतो हे पाहणे महत्वाचे आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीची वाचा:

Manoj Jarange Patil and Bacchu Kadu: मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा फोन, म्हणाले, ‘शिंदे साहेबांना वाईट वाटलं, ते म्हणाले…’

Eknath Shinde: एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *