Sachin Ahir Joins Shivsena : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी दुसरा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर आता लवकरच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, अहिर आता यापुढे शिंदे यांच्या पक्षाचे काम करणार आहेत. पण तरीदेखील मी पक्ष सोडलेला नाही, असे खळबळ उडवून देणारे विधान अहिर यांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ते आमच्याच निवडणूक चिन्हावर निवडून आलेले आहेत, असे सांगितले आहे. दरम्यान, आता सचिन अहिर यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. परंतु कायद्याच्या कसोटीवर सचिन अहिर यांना संरक्षण मिळू शकते असे सांगितले जात आहे. याबाबत अॅड. असीम सरोदे यांनी कायदेशीर बाजू समजावून सांगितले आहे.
अहिर यांच्यावर कारवाई करता येणार नाही?
असीम सरोदे यांच्या मतानुसा सचिन अहिर यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. ते उपसभापती झाल्यास कोणतीही कारवाई करता येत नाही. कारण विधानपरिषदेचे सभापती, उपसभापतीपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद यांना अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण देण्यात आलेले आहे. तशी तरतूद आहे. शिंदे गटाकडून अहिर यांना विधानपरिषदेचे उपसभापतीपद दिले जाणार आहे. त्यामुळे अहिर हे उपसभापती होताच त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळेल. पक्षांतर बंदी कायदा त्यांच्यावर लागू होणार नाही, असे म्हटले जात आहे.
अहिर यांना आम्हीच मतदान केलेलं, ते आमच्याच चिन्हावर…
दुसरीकडे अहिर जेव्हा आमदार झाले तेव्हा आम्हीच त्यांना मतदान केले होते. ते आमच्याच शिवसेना पक्षाकडून, धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही आमच्याकडेच आहे. त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न येत नाही, असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.