सावधान! बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र, 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता


Maharashtra Rain News : राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे. का भागात पेरणीच्या कामांना देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे. अशातच हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी पावसासंदर्भातील अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदुर पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळं पाऊस परतण्याची शक्यता आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट

3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेलच त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल असी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.  यावर्षी एल निनोमुळे पाऊस कमी आहे. हे आधीच सांगितले आहे. मॉन्सुनचे वारे कमकुवत आहेत. एल निनोचा परिणाम पुढील वर्षी देखील जाणवणार असला तरी पुढील वर्षीच्या पावसाचा अंदाज आता सांगता येणार नाह अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली. 

रायगड जिल्ह्याला पुढील पाच दिवस पावसाचा ऑरेंज ॲलर्ट

रायगड जिल्ह्याला पुढील पाच दिवस पावसाचा ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगडच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्याला दिलासा दिला आहे. रायगड मध्ये 23 जूनला सुरू झालेल्या पावसाने दोन दिवस दडी मारली होती. मात्र, कालपासून पुन्हा पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दिवसात शेतीची लावणी सुरू होण्याची शक्यता आहे. रायगड मधील अनेक नद्यांच्या पाणीपातळी मध्ये देखील हळूहळू वाढ होत असून पाण्याची चिंता मिटली आहे.

हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हयातनगर, लिंगी, पळशीसह परिसरातील शिवार जलमय झाले असून अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे लहान-मोठे ओढेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला हा पहिला समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. वसमत तालुक्यातील हयातनगर, लिंगी आणि पळशी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळात शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर अनेक ओढे प्रवाहित झाल्याने परिसरातील निसर्गही बहरून गेला. गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. आता पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *