Colors Marathi Aai Tuljabhavani: पाताळदेवीला आव्हान देण्यासाठी आई तुळजाभवानी सज्ज, दिव्य स्वास्तिकाचा निर्णायक महिना उलगडणार


Aai Tuljabhavani Colors Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tuljabhavani) मध्ये प्रेक्षकांना ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ (Entertainment) पाहायला मिळणार आहे. मालिकेत मानवी मनाला छळणाऱ्या अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या 4 भयंकर विकारांविरुद्ध आई तुळजाई घनघोर युद्ध पुकारणार आहे. आदिशक्तीचे अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या ‘दिव्य स्वस्तिकाचा’ महिमा उलगडून सांगणारा आणि चार विकारांविरुद्ध रंगणारा हा दैवी महासंग्राम नक्की पहा या जुलै महिन्यात.

संपूर्ण भुलोकावर विकारांचे साम्राज्य निर्माण करून आगामी चातुर्मासात विघ्न निर्माण करण्यासाठी  पाताळातील एक अघोरी, आदिम शक्ती ‘पाताळदेवी’ जागृत झाली आहे. पाताळदेवीचा हा कट आणि तिची योजना त्यावर  आई तुळजा भवानी कसा मार्ग काढणार, कसे त्याला परतवून लावणार हे बघणे रंजक असणार आहे. पाताळदेवी भुजंगाच्या माध्यमातून एका निष्पाप कुटुंबाला लक्ष्य करून, मानवी मनाला कैद करणाऱ्या चार विकारांचा वणवा पेटवणार आहे. 

आई तुळजाभवानी यांनी घेतलेली भूमिका अत्यंत वेगळी आहे (Aai Tuljabhavani July Month Special Episode in Color Marathi)

अवकाशात प्रकट झालेल्या ‘दिव्य स्वस्तिकातील’ ताऱ्यांचे तेज लोकांच्या सत्कर्माने वाढणार आहे, पण पाताळदेवी ते तेज कायमचे विझवण्यासाठी आपला पहिला डाव खेळणार आहे. ब्रह्मांडात निर्माण झालेल्या या अभूतपूर्व संकटामुळे आता युद्धाची ठिणगी पडली आहे. या दुष्ट विकारांविरुद्ध तुळजाईने  घनघोर युद्ध पुकारले आहे. विशेष म्हणजे झुंजायाला बळ देणारी समस्त भक्तांची कुलदैवता असलेल्या आई तुळजाभवानीने  घेतलेली भूमिकाही वेगळी आहे. 

“मला भक्तांची संकटं नाहीशी करायची नाहीत, तर त्यांना संकटांवर मात करण्याची शक्ती द्यायची आहे,” हा आई तुळजाईचा खणखणीत निर्धार प्रत्येक सामान्य प्रेक्षकामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. पाताळदेवीच्या अशुभाच्या सावलीतून आणि भुजंगाच्या नव्या पाताळी मायावी शक्तीपासून  आई तुळजाभवानी आपल्या भक्तांचे रक्षण कशी करणार? भाग्यकुंभावर उमटणारे ‘स्वस्तिक’ कोणते नवे चमत्कार घडवणार? हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. भक्ती आणि दुष्ट शक्तीच्या या अद्वितीय महायुद्धाचा साक्षीदार होण्यासाठी दररोज रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी आई तुळजाभवानी ही सिरिअल कलर्स मराठीवर नक्की पाहा.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘अजुनही मला धोका आहेच…’, बर्थ डेच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीला काय झालं? नुकतीच दुबईहून भारतात परतली, कारण…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *