शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा राजकीय धक्का दिला आहे. दोन आठवड्यात शिंदे सेनेने ठाकरे गटाला दिलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर फुटले आहेत. ठाकरे गटाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. सचिन अहिर यांनी विधानसभेत वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा राजकीय झटका बसला आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विधान परिषदे उपसभापती देण्यात आलं आहे.
(बातमी अपडेट होत आहे)