भाजप खासदार – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता वीर दास स्टारर ’रिव्हॉल्व्हर राणी’ पुन्हा चर्चेत आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. सिनेमात कंगना आणि विर यांच्यामध्ये एक किसिंग सीन शूट करण्यात आला. त्या किसिंग सीनबद्दल नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये वरिष्ट पत्रकार सिमी चंडोक यांनी असा दावा केली की, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्रीने विरला जखमी केलं होतं. चंडोक यांनी केलेला दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त सीनचीच चर्चा रंगलेली असताना स्वतः अभिनेता पुढे आला आणि यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणालेल्या सिमी चंडोक?
नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये सिमी यांनी दावा केला की, ‘जेव्हा कंगना ‘रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाचं शूट करत होत्या, तेव्हा एका सीनमध्ये त्यांना वीर दास याला पॅशनेट किस करायचं होतं… किसिंग सीनमध्ये कंगना पूर्ण हरवून गेलेल्या, दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील त्या किस करत राहिल्या. त्यांनी अभिनेत्याच्या ओठांचा रक्त येईपर्यंत चावा घेतला..’ असं सिमी म्हणाल्या यावर अभिनेत्याने स्पष्टिकरण दिलं आहे.
काय म्हणाला अभिनेता वीर दास
सोशल मीडियावर प्रकरण वाढल्यानंतर, एका नेटकऱ्यांने वीर दास याला टॅग केलं आणि आता गप्प का? अशी विचारणा केली. यावर विर दास याने लिहिलं, ‘सध्या ज्या काही अफवा सुरु आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. कंगना सेटवर एक प्रचंड प्रोफेशनल कलाकार असतात. आज देखील मी मानतो की, त्या प्रतिभावान कलाकार आहे. सध्या त्यांच्याबद्दल चुकीच्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत.
अभिनेता पुढे म्हणालेला, ‘काही वर्षांनंतर माझ्या कॉमेडीमुळे त्यांनी मला ‘दहशतवादी’ असंही म्हटलं होतं; पण सेटवर मात्र… काहीच समस्या उद्भवल्या नाहीत.” वीर दास यांच्या या विधानावरून हे स्पष्ट होतं की, जरी त्यांच्यात राजकीय किंवा वैयक्तिक मतभेद असले, तरी कामाच्या बाबतीत कंगना पूर्णपणे व्यावसायिक राहिल्या.
कंगना यांच्या ‘रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात कंगना यांनी ‘अल्का सिंग’ या महिला राजकारणी आणि गँगस्टरची भूमिका साकारली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. पण कंगना आणि वीर दास यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.