Vat Purnima 2026: सौभाग्याचा सण… आनंदाचा सण…महिलांचा सगळ्याच आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा… हा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात तर हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच उपवास करतात. महिलांसाठी हा दिवस म्हणजे साज-श्रृंगार करण्याचा दिवस, या दिवशी अनेक महिला विविध रंगांच्या साड्या नेसतात. पण तुम्हाला माहितीय का? काही रंग असे असतात, जे धार्मिक मान्यतेनुसार पूजेसाठी अजिबात योग्य मानले जात नाहीत. वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्याचा असल्याने या दिवशी काही विशिष्ट रंग परिधान न करण्याची श्रद्धा आहे. जाणून घ्या असा कोणता रंग आहे. जो या दिवशी परिधान करण्यास वर्ज्य मानला जातो. आणि कोणते रंग या दिवसासाठी शुभ असतात? धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व जाणून घ्या…
वटपौर्णिमा 2026 तिथी, शुभ योग…(Vat Purnima 2026)
हिंदू दिनदर्शिकेनुसार, वटपौर्णिमा 2026 महाराष्ट्रात सोमवार, 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असल्याने विवाहित महिला वटसावित्री व्रत, वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करतात. पंचागानुसार, पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. धार्मिक कार्य, दानधर्म, जप-तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. पंचागानुसार, वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो
वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी टाळावी?
काळा रंग – धार्मिक मान्यतेनुसार, काळा हा रंग नैराष्याचा मानला जातो, त्यामुळे व्रत, पूजा आणि धार्मिक कार्यात टाळावा.
गडद राखाडी किंवा निळसर काळसर रंग – धार्मिक मान्यतेनुसार, हे देखील नैराश्याचे किंवा शनि संबंधीत रंग असल्यामुळे टाळावेत.
फिकट मळकट किंवा अतिशय गडद, फिकट रंग हेही टाळावेत.
प्रत्येक राशीनुसार वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जाणून घ्या….
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेला लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसावी. हा रंग त्यांच्यासाठी ऊर्जा आणि शुभतेचे प्रतीक आहे.
वृषभ (Taurus)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या स्त्रियांसाठी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची साडी शुभ मानली जाते. हा रंग सौंदर्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरव्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी, ज्यामुळे आनंद व उत्साह वाढतो.
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या स्त्रियांना पांढरी किंवा चंदेरी (सिल्व्हर) रंगाची साडी परिधान करणे शुभ ठरते, कारण हा रंग शांती आणि सौम्यता दर्शवतो.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या स्त्रियांसाठी केशरी किंवा सोनेरी रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते, कारण हा रंग तेज आणि प्रतिष्ठा दर्शवतो.
कन्या (Virgo)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या स्त्रियांनी फिकट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, जी त्यांच्यातील सुसूत्रता आणि शुद्धता दर्शवते.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या स्त्रियांना निळ्या किंवा गुलाबी रंगाची साडी शोभा देईल. हे रंग संतुलन तसेच प्रेमाचे प्रतीक आहेत.
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी गडद लाल किंवा माजेंटा रंगाची साडी घालावी, जी त्यांच्यातील उत्कटता आणि दृढ इच्छाशक्ती वाढवते.
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या स्त्रियांसाठी पिवळा किंवा केशरी रंग अत्यंत शुभ आहे, कारण हा रंग अध्यात्म आणि ज्ञान दर्शवतो.
मकर (Capricorn)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या स्त्रियांनी फिकट निळसर हिरवा रंग निवडावा, पण गडद राखाडी किंवा काळसर रंग टाळावा.
कुंभ (Aquarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो, ज्यामुळे आध्यात्मिकता आणि स्थैर्य वाढते.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या स्त्रियांनी पांढरी, गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, कारण हे रंग भावना आणि शुभतेचे प्रतीक आहेत.
वटपौर्णिमा 2026 तिथी
वैदिक पंचांगानुसार, यंदा वटपौर्णिमा उदयतिथीनुसार सोमवार, 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल.
पौर्णिमा तिथी प्रारंभ: 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 वाजता.
पौर्णिमा तिथी समाप्ती: 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 वाजता.
पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त…
वैदिक पंचांगानुसार, यंदा 29 जून रोजी सकाळी 06:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. शास्त्रांनुसार, वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे. या 6 तासांच्या शुभ मुहूर्तात महिला आपली पूजा पूर्ण करू शकतात.
हेही वाचा :
Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी