Salman Khan Bigg Boss: सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये त्याच्या सख्ख्या भावाची एन्ट्री? अभिनेता म्हणाला, ‘भाईचा शो आहे, त्यामुळे थोडा…


Sohail Khan on Bigg boss: प्राइम व्हिडीओचा (Prime Video) नवीन रिअॅलिटी शो ‘अल्यान्स’ (Alliance) सध्या प्रचंड चर्चेत आहे.   या शोचे होस्ट कुणाल खेमू असून, या शोच्या पहिल्या एपिसोडने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याने या बहुचर्चित असणाऱ्या शोमध्ये पहिला वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री करणार आहे. एकीकडे सोहेल खान (Sohail Khan) या रिअॅलिटी शोचा भाग होणार (Bigg boss) असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर, दुसरीकडे सोहेल खान भाऊ सलमान खानच्या ‘बिग बॉस’ शोमध्ये एन्ट्री करेल का? (Salman khan) असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतंच सोहेल खानने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या प्रश्नावर त्याने प्रतिक्रिया दिली.

सोहेल खानने नुकतंच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला, ‘रिअॅलिटी शोजमध्ये पदार्पण केल्यानंतर  भविष्यात सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये पदार्पण करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.  तेव्हा सुरुवातील सोहेल खान हसला. प्रतिक्रिया देत म्हटला, ‘ऑडियन्स नक्की काय प्रतिक्रिया देतील, किंवा ते मला कसे स्वीकारतील हे मला माहित नाही. जर मी त्या शोमध्ये गेलो तर, कदाचित लोक असंही म्हणू शकतील की, ‘भावा’ चा शो आहे. त्यामुळे थोडं एकतर्फी असेल’, असं सोहेल खान म्हणाला.

सलमान खानच्या शोमध्ये जाण्यापूर्वी सोहेल खाननं एक भीतीही व्यक्त करुन दाखवली (Sohail Khan reacts on Bigg Boss participation)

‘त्याहून काहीतरी उलट होऊ शकतं. सलमान भाऊ माझ्यावर ओरडूही शकत.  जास्त आक्रमक होऊन मला ओरडू शकतो. लोक असाही विचार करु शकतात, मी त्याचा भाऊ आहे म्हणून, मला जास्त फ्रिडम मिळू शकते. त्यामुळे त्या शोमध्ये जाणं कोणत्याही टास्कपेक्षा मोठी गोष्ट नाही’, असंही सोहेल म्हणाला. यावेळी सोहेलने सध्याच्या प्रवासावरही भाष्य केलं आहे. 

‘अलायन्स हा शो माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. जर माझा रिअॅलिटी शोबाबत अनुभव चांगला राहिला, तर मी पुढे जाऊन अशा प्रकारचे शोज करेन’, असंही सोहेल खान म्हणाला. सध्या सोहेल खान या शोमधून आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.  दरम्यान, प्रेक्षकांना हा शो कितपत आवडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *