Maharashtra News LIVE : पाकिस्तानच्या कराचीवर मोठा दहशतवादी हल्ला, 4 रेंजर्स ठार – Marathi News | Maharashtra news live updates in Marathi aajchya thalak batamya 28 June 2026 Monsoon alert rain Weather update Sanjay Dina Patil Uddhav Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Ketan Agarwal Murder case


  • 28 Jun 2026 09:55 AM (IST)

    हरित मान्सून अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम

    उन्नत नाशिक अभियान आणि हरित मान्सून अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर यांच्यासह मनपा आयुक्त आणि नगरसेवकही सहभागी झाले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम राबवली जात आहे.

  • 28 Jun 2026 09:45 AM (IST)

    शिवडीच्या बीडीडी चाळी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

    वरळी, नायगाव आणि एन.एम. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम वेगाने प्रगतिपथावर असताना केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मंजुरी न मिळाल्याने शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रदीर्घ काळापासून रखडला आहे.

  • 28 Jun 2026 09:40 AM (IST)

    मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ AC लोकल धावणार

    वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील (Main Line) सध्याच्या 12 नॉन-एसी लोकल फेऱ्यांचे एसी (AC) लोकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या 12 नवीन फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेच्या नेटवर्कवरील एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 120 वर पोहोचणार आहे.

  • 28 Jun 2026 09:25 AM (IST)

    घरणी जवळ दोन कार अडवून लुटल्याची धक्कादायक घटना

    लातूर जिल्ह्यातल्या घरणी जवळ दोन कार अडवून लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत प्रवासी महिला मुलांच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत लुटले होते. या घटनेतील आरोपी आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. या टोळीतील तिघे जण पळून गेले आहेत तर एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे.

  • 28 Jun 2026 09:15 AM (IST)

    कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेल्यामुळे जिल्हाध्यक्षाचा संताप

    अमळनेर येथे कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेण्यात आल्याच्या प्रकाराबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाने यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचे निलंबनाची मागणी भूषण भदाने यांनी केली आहे.

  • 28 Jun 2026 09:12 AM (IST)

    उद्योजकाची तब्बल 97 लाख 50 हजारांत ऑनलाइन फसवणूक

    जळगावच्या भुसावळ येथील उद्योजकाची तब्बल 97 लाख 50 हजारांत ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विलास पाटील अँड असोसिएट कंपनीचे मालक विलास जयराम पाटील यांची फसवणूक झाली आहे.

  • 28 Jun 2026 09:10 AM (IST)

    पाकिस्तानच्या कराचीवर मोठा दहशतवादी हल्ला, 4 रेंजर्स ठार

    पाकिस्तानच्या कराची शहरात शनिवारी रात्री मोठा आत्मघाती हल्ला झाला. समोर आलेल्या माहितीनुसार कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील युनिव्हर्सिटी रोडजवळ अचानक जोरदार आवाजासह स्फोट झाले. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यात चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्युत्तर कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *