फडणवीस, ठाकरेंचा एकाच विमानाने प्रवास; शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला – Marathi News | Fadnavis and Thackeray travel on the same flight Eknath Shindes first reaction


शुक्रवारी मुंबईवरून नागपूरला जाताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यावेळी उद्धव ठाकेर यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते देखील होते.  दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन देखील केलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची विचारपूस देखील केली. या भेटीवर बोलताना आमची भेट झाली हीच मोठी बातमी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे आमची उच्चस्थरीय चर्चा झाली अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. दरम्यान फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवासावर आता उपमुख्यमंत्री एकाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

‘जनतेनं त्यांना एकाच विमानातून प्रवास करायचं तिकीट दिलं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात सुटले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत. आणि त्यांनी 2019 ला कपटी मित्र किती घातक असू शकतो? हे पाहायलं आहे, असं या विमान प्रवासावर बोलताना शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या विमान प्रवासावर प्रतिक्रिया देताना आमची उच्चस्थरीय चर्चा झाली अशी प्रतिक्रिया या विमान प्रवासावर उद्धव ठाकरे यांनी दिली होती, यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विमानपेक्षा इमान महत्त्वाचं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेनं एकाच विमानातून प्रवास करायचं तिकीट दिलं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजमधून प्रवास सुरू केला, असा टोलाही यावेळी शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

राज्यात नुकतचं ऑपरेशन टायगर झालं आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला, या पार्श्वभूमीवर या एकत्रित विमान प्रवासाला महत्त्व प्राप्त झालं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *