Last Updated:
Mumbai Crime : सोशल मीडियावरील एका अज्ञात संपर्कामुळे मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन महिने चाललेल्या या अदृश्य सापळ्यात अडकल्याने एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून सायबर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मुंबई : आपल्यापैकी बहुतेकजण रोज मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. इंटरनेटवरील प्रत्येक संदेश, लिंक किंवा अॅप विश्वासार्ह असेलच असे नाही.मात्र कधी कधी क्षणात त्या गोष्टींवर ठेवलेला विश्वास, मोठ्या नफ्याचे आमिष किंवा आकर्षक ऑफर यामुळे अनेकदा व्यक्तीला फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा संपर्क साधला. त्यानंतर तुम्हाला शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळेल शिवाय आयपीओममध्ये ही गुंतवणूक केल्यास काही दिवसांत कोट्यवधींचा नफा मिळू शकतो असे सांगून त्यांचा सुरुवातीस पूर्णपणे विश्वास मिळवण्यात आला.
आरोपींने तक्रारदार व्यक्तीला एक ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितले आणि त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासही सांगितले. समोरच्यावर विश्वास आणि सुरुवातील व्यवहार व्यवस्थित सुरु असल्याचे दाखवले. एवढेच नव्हे तर त्यांनी काही दिवसांनी दुसऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील सहभागी करुन घेतले. ज्यामध्ये त्यांना गुंतवणुकीसंदर्भात अनेक सुचना देण्यात आलेल्या होत्या.
त्यानंतर आरोपींनी एका अॅपचाही वापर करुन तक्रारदार व्यक्तीशी संपर्क सुरुच ठेवला. बनावट ट्रेडिंग अॅपवर अधिकचा नफा झाल्याचे दाखवले आणि अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. त्यामुळे तक्रार व्यक्तीने टप्याटप्याने मोठी रक्कम ही विविध खात्यात जमा केली.
11 एप्रिल ते 24 जून या दिवसांत व्हॉट्सअॅप ग्रुप शिवाय बनावट ट्रेडिंग अॅप आणि सिग्नल अॅपच्या माध्यमातून आरोपींनी तब्बल 47 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केलेली आहे शिवाय नंतर पैसे परत मिळत नसल्याने त्यांना संशय आला त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल करुन घेतला आणि सध्या संबंधित असलेल्या गोष्टींची तपासणी सुरु केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचा सध्या शोध सुरु आहे.
Mumbai,Maharashtra
Shocking Crime : अंगावर काटा आणणारी घटना! मोबाईल स्क्रीनवरील एका गोष्टीने संपूर्ण आयुष्यच बदलले; घडलं काय?
