Rohini Khadse on TET Exam Paper Leak: महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे (Paper Leak) सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. 28 जून 2026 रोजी राज्यभरात होणारी अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खळबळजनक प्रकारानंतर शिक्षण विभागाने (Education Department) तातडीने पावले उचलत रविवारी होणारी ही परीक्षा स्थगित (Postponed) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
टीईटी पेपरफुटीच्या या गंभीर प्रकारासंदर्भात रोहिणी खडसे आपल्या सोशल मीडिया हँडलवरून म्हणाल्या की, “नीट पेपरफुटीचे उदाहरण ताजे असताना टीईटीने पेपर फुटू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती. पण कुणाला काही पडले आहे का ? जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार ? टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते? प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व काही शांत होते. पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गेलेले महिने, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
#TET चा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते?
प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची… pic.twitter.com/UjhzZz3Bee
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 27, 2026
TET Exam Paper Leak: भिवंडीत पोलिसांची मोठी कारवाई; अशी झाली पोलखोल
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 28 जून रोजी राज्यातील 1028 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार होती. केंद्रीय पातळीवरील नीट (NEET 2026) परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन राज्य परीक्षा परिषदेने कडक सुरक्षा उपाययोजना केल्याचा दावा केला होता. तथापि, आज 27 जून रोजी पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) काही संशयित इसमांच्या ठिकाणावर अचानक धाड (Raid) टाकली.
या कारवाईदरम्यान संशयितांकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दलची माहिती आणि प्रश्न आढळून आले. तपासणीसाठी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून पडताळणी केली असता, जप्त करण्यात आलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिका यातील काही प्रश्न समान असल्याचे उघड झाले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून कोचिंग क्लास चालक आणि शिक्षण विभागातील संशयितांची चौकशी सुरू आहे.
TET Exam Paper Leak: परीक्षा पुढे ढकलली
हा संपूर्ण गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिकेची गोपनियता भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी या हेतूने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे. या परीक्षेची पुढील अद्ययावत तारीख अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी झालेल्या या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो परीक्षार्थींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!