Sri Lanka A vs India A 1st Unofficial Test : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या इंडिया-ए संघाचे फलंदाज यजमान संघाच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडले. गाले येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या अनऑफिशियल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आधी सलामीवीर साई सुदर्शनने कमाल केली. त्याने 132 धावांची खेळी खेळली आणि त्यानंतर आता कर्णधार ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) देखील आपला जलवा दाखवला आहे. कर्णधाराने डावाची सूत्रे हाती घेत 181 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.
जुरेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाल्यानंतर त्याने अत्यंत संयमी सुरुवात केली. पण, शतक झळकावल्यानंतर त्याने गियर बदलला आणि वेगाने धावा करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 110 षटकांचा खेळ पूर्ण होईपर्यंत भारताने 5 गडी गमावून 439 धावा केल्या आहेत. जुरेल 208 चेंडूंमध्ये 131 धावांवर, तर हर्ष दुबे 50 चेंडूंमध्ये 31 धावांवर नाबाद खेळत आहेत. इंडिया-ए संघ सध्या अत्यंत मजबूत स्थितीत दिसत आहे.
प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सहावे शतक (Sri Lanka A vs India A 1st Unofficial Test)
इंडिया-ए चा कर्णधार ध्रुव जुरेलने सामन्याच्या पहिल्या डावात 181 चेंडूंत शानदार शतक पूर्ण केले. या संयमी खेळीदरम्यान जुरेलने 9 चौकारही लगावले. त्याच्या प्रथम श्रेणी (First-Class) क्रिकेट कारकिर्दीतील हे एकूण सहावे शतक आहे. या खेळीव्यतिरिक्त, त्याने 34 सामन्यांमध्ये 52.95 च्या सरासरीने 2330 धावा केल्या आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलिया-ए आणि दक्षिण आफ्रिका-ए विरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या जुरेलने आता श्रीलंका-ए विरुद्धही शतक झळकावून हे सिद्ध केले आहे की, तो कठीण परिस्थितीत संघाला सावरण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
– Hundred vs Australia A
– Hundred vs South Africa A
– Hundred vs Sri Lanka ADHRUV JUREL – The Captain of India A leading by example 🇮🇳💪
Really hope he makes it count in Tests at Number 6, doing everything for India A setup, wishing he gets a right frame in Senior side. pic.twitter.com/eX8dtuDIAI
— Johns. (@CricCrazyJohns) June 26, 2026
शेख रशीदसोबत 136 धावांची भागीदारी
साई सुदर्शनच्या रूपाने 217 धावांवर चौथी विकेट पडल्यानंतर ध्रुव जुरेलला तरुण फलंदाज शेख रशीदची उत्तम साथ लाभली. या दोघांनी मिळून श्रीलंकेच्या गोलंदाजांना विकेटसाठी चांगलेच तरसवले. जुरेल आणि रशीद यांच्यात पाचव्या विकेटसाठी 232 चेंडूंमध्ये 136 धावांची महत्त्वपूर्ण शतकीय भागीदारी झाली. शेख रशीदनेही कर्णधाराला चांगली साथ देत 113 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांच्या मदतीने 63 धावांची शानदार अर्धशतकीय खेळी खेळली.
साई सुदर्शनने रचला मोठ्या धावसंख्येचा पाया
यापूर्वी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात सलामीवीर साई सुदर्शनने धावांचा पाऊस पाडला होता. सुदर्शनने अवघ्या 175 चेंडूंचा सामना करत 132 धावांची झंझावाती खेळी केली. सुदर्शनने आपल्या खेळीदरम्यान दोन मोठ्या भागिदाऱ्या केल्या. त्याने आयुष पांडेसोबत पहिल्या विकेटसाठी 78 धावा केल्या, तर ऋतुराज गायकवाडसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. यानंतर सुदर्शनने कर्णधार जुरेलसोबत चौथ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली होती.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला