मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज असून संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
