INDW vs BANW Toss : टीम इंडियाची करो या मरो सामन्यात फिल्डिंग, बांगलादेशला झटपट रोखण्याचं आव्हान – Marathi News | Icc t20i world cup 2026 indw vs banw bangladesh women elected batting against india see playing 11


यसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार निगर सुल्ताना हीने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघांसाठी करो या मरो स्थिती

टीम इंडिया आणि बांगलादेश दोन्ही संघांची या स्पर्धेत आतापर्यंत सारखीच कामगिरी केली आहे. भारत आणि बांगलादेश महिला संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1-1 सामना गमावला आहे. भारताला सलग 2 विजयानंतर गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर बांगलादेशला विजयी सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत व्हावं लागलेलं. मात्र त्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करुन कमबॅक केलं. त्यामुळे आता बांगलादेश टीम इंडिया विरुद्ध कसा खेळ करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बांगलादेशने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

टीम इंडियात 2 बदल

तसेच टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत. राधा यादव आणि रेणूका सिंह ठाकुर या दोघींचा समावेश करण्यात आला आहे. तर प्रेमा रावत आणि अरुंधती रेड्डी यांना डच्चू देण्यात आला आहे.

टीम इंडिया वरचढ

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 23 पैकी सर्वाधिक 20 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला फक्त 3 सामन्यांत यश मिळालं आहे. तसेच दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही चौथी वेळ आहे. भारताने याआधीच्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि नंदनी शर्मा.

बांगलादेश वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : दिलारा अक्टर, जुएरिया फिरदोस, शर्मीन अख्तर, निगार सुल्ताना (कर्णधार आणि विकेटकीपर), शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, शांजिदा अक्टर मेघला आणि मारुफा अक्टर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *