Last Updated:
Sanjay Dina Patil : शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे
मुंबई: शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संजय पाटील यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर संजय पाटील यांनी अर्वाच्च भाषा वापरत पत्रकारांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.
खासदार संजय दीना पाटील यांनी पक्षांतर केल्यानंतर स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या दोन्ही गटात तणावाची स्थिती आहे. आपल्याविरोधात कोणी चालून आल्यास त्यांना सोडणार नसल्याच्या आशयाचे वक्तव्य खासदार पाटील यांनी केले होते. त्याशिवाय, त्यांनी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात येत होता. संजय पाटील यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिले होते. संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रात खासदार संजय पाटील यांनी केवळ ५ जणांच्या हत्येची कबुलीच दिली नाही, तर “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन,” अशीही धमकी दिल्याचे म्हटले. एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे राऊत यांनी म्हटले होते.
फुटीर खासदार संजय पाटील बिथरले, थेट पत्रकारांना धमकी…
संजय पाटील यांनी म्हटले की, माझे ते वक्तव्य पुन्हा पाहा…पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले तरी मी जाईल. मला काय विचारणा झालं तर मी जाईन बोलेन ना तिकडे. हा, आणि कुठे काय कॅमेऱ्यावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय. कॅमेऱ्यावर बोललोय, जे बोललोय जे आहे ते समोर जाणार…असल्याचे पाटील यांनी सांगितले. हे जे करणार ते भोगणार असेही पाटील यांनी म्हटले.
त्यानंतर संजय पाटील यांच्यावर पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. त्यावर संजय पाटील यांना संताप अनावर झाला.
पत्रकारांच्या प्रश्नावर संतापलेल्या संजय दीना पाटील यांनी म्हटले की, इज्जत करतोय, इज्जत करा! काय होतोय परत? तुम्ही उगीच माझ्या XXX बोट घालतायत. मी घे, रेकॉर्ड कर! इज्जत करतो, उगीच डोक्यात जाऊ नका. उगीच डोक्यात जाऊ नका, घराखाली उभा राहू देतोय, काय? उगीच त्यांच्याकडे चल. ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचंय ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, हा सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा, बाजूला कशाला XXX घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली ना ती, सांगितलं ना सर्व , अशा शब्दात संजय पाटीलांची जीभ घसरली.
Mumbai,Maharashtra
Sanjay Patil: ”इज्जत करतोय, डोक्यात जाऊ नका, नाहीतर मारुन टाकेल…”, प्रश्न विचारताच फुटीर खासदार बिथरला,थेट जीवे मारण्याची धमकी
