Anushka Sarkate Nikhil Chavan Wedding: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) आणि निखिल चव्हाण (Nikhil Chavan) खऱ्या आयुष्यात लग्न बंधनात अडकले आहेत. जवळच्या मित्र परिवारांच्या आणि कुटुंबीयांचे उपस्थितीत मोठ्या थाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगर येथे हा लग्न सोहळा संपन्न झाला.निखिल आणि अनुष्का यांनी आता खऱ्या आयुष्यात वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे.दोघांच्याही लग्नातील खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केलंय.
अनुष्का सरकटे निखील चव्हाणचा विवाहसोहळा चर्चेत
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांच्या नात्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपुडा केलेला. अनुष्काच्या मेहंदीची आणि लग्नापूर्वीच्या सोहळ्यांची ही चर्चा रंगलेली. आज दोघांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नातील त्यांच्या पारंपरिक लुकने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. अनुष्काने खास नऊवारी साडी नेसली होती. पारंपरिक मराठमोळ्या लुक मध्ये दोघेही प्रचंड सुंदर दिसत होते. निखिल नही धोतर आणि कुर्ता परिधान केला होता . डोक्यावर तुळस आणि हातात भगवा झेंडा घेत निखिल आणि अनुष्का यांनी लग्न मंडपात एंट्री घेतली.त्यांच्या विलक्षण एन्ट्रीचीही सध्या चर्चा रंगली आहे. अनेक सेलिब्रेटी त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. त्याची धमाल, हळद, संगीत समारंभातील धमालही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतेय.
हळदी समारंभातही अनुष्का आणि निखीलने वाजत गाजत एन्ट्री घेतली होती. त्यांच्या या सोहळ्याचे व्हिडीओही सोशल मिडीयावर आहेत.
‘कारभारी लय भारी’ या मालिकेत निखिल आणि अनुष्काने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.आता या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहताना चाहते आनंद व्यक्त करत आहेत. निखिलने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील त्याच्या भूमिकेचं महाराष्ट्रभरातून कौतुक झालं.तर अनुष्का ‘वचन दिले तू मला ‘ या मालिकेतून सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ती यापूर्वी ‘तुझीच रे ‘, ’36 गुणी जोडी ‘, श्री लक्ष्मीनारायण या मालिकांमध्ये दिसली आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष