Mumbai Rain: पावसाच्या पहिल्याच दिवशी BMC ने ‘तुंबई’ करून दाखवली, सायनजवळ सबवे पाण्याखाली, VIDEO | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

पावसाने तर पहिला दिवस गाजवला पण मागील दोन महिन्यांपासून पाणी साचणार नाही, यासाठी मोहीम राबवणाऱ्या मुंबई पालिकेचं पितळ उघडं पडलं

News18
News18

मुंबई : कधी येणार कधी येणार म्हणून चातकासारखी वाट पााहून असलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. पण, पहिल्याच दिवशी मुंबई पालिकेचा फ्लॉप शो पाहण्यास मिळाला मुंबईतील मुंबईतील सायन हायवे येथील सबवेच्या आत पाणी भरल्याचा प्रकार समोर समोर आला आहे.

मुंबईमध्ये पावसाचा आज पहिलाच दिवस होता, पावसाने तर पहिला दिवस गाजवला पण मागील दोन महिन्यांपासून पाणी साचणार नाही, यासाठी मोहीम राबवणाऱ्या मुंबई पालिकेचं पितळ उघडं पडलं आहे.  पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील सायन हायवे येथील सबवेच्या आत पाणी भरल्याचा प्रकार समोर आला आहे.  सायन हायवे जवळील एवरार्डनगर येथील सबवेमध्ये  पाणी तुंबलंय. पहिल्याच पावसामध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.  सध्या या ठिकाणी पंपाने पाणी काढण्याचं काम सुरू आहे. पण, मागील महिन्याभरापासून नालेसफाई, पाणी साचणार नाही, यासाठी सुरू असलेली मोहीम नेमकी पाणी तुंबण्याासाठीच सुरू होती का असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

Mumbai Rain: पावसाच्या पहिल्याच दिवशी BMC ने ‘तुंबई’ करून दाखवली, सायनजवळ सबवे पाण्याखाली, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *