परभणी जिल्ह्यांचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत फारकत घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय जाधव अनेक वर्षांपासून परभणीचे प्रतिनिधित्व करत आहेत. आमदार आणि त्यानंतर खासदार म्हणून संजय जाधव निवडून आले. अचानक बंडू जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने परभणी जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. यादरम्यानच संजय राऊत यांच्याकडून खासदार संजय जाधव यांच्यावर टीका करण्यात आली. खासदार संजय जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर बोलताना म्हटले की, माझा निधी लॅप्स झाला नाही,आचारसंहिता आणि इमर्जन्सीसाठी निधी बचत ठेवतो. आम्ही टक्केवारी घेतो तर तुम्ही किती टक्केवारी घेता हे त्यांना विचारा. माझा निधी मी शेवटच्या वर्षातही खर्च करू शकतो, 5 कोटी निधीत दीड हजार गावं आम्ही कोणाकोणाची गरज भागवणार असं जाधव म्हणाले. आम्ही लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला.
संजय राऊत हे उंचितले माणसं आहेत, ते मोठे माणसं आहेत. त्यांनी माझ्यावर बोलाव म्हणजे त्यांची उंची कमी होईल, त्यांनी काय बोलाव हा त्यांचा अधिकार आहे. परंतु ते जे तुडवण्याची भाषा करत होते. वैचारिक लेवल आणि वैचारिक पातळी गाठलेल्या माणसाने तुडवण्याची भाषा करू नये. काय कारवाई व्हायची ते होऊ देत आम्ही समर्थ आहोत, कारवाई झाली तर आमची खासदारकी जाईल त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. असं जाधव म्हणाले.
घेतलेले 50 कोटी 100 कोटी कुठे ठेवलेत हे मलाही बघावं लागेल. माझा ठेकेदारीचा व्यवसाय नाही आणि पैसे घ्यायचे असतील तर संजय राऊत आणि त्यांच्याकडे होतो, तेव्हा मला किती पैसे दिलेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही मध्यस्थी करायला होते तुम्ही आम्हाला किती पैसे दिलेत हे सांगा. गोरगरीब जनतेत राहत असताना कधी कोणाची काय अडचण येईल आणि कधी काय गरज पडेल हे आम्हाला माहित आहे.
पुढे संजय जाधव यांनी म्हटले की, तुम्ही राज्यसभेवर खासदार आहात हे तुम्हाला माहित नाही कधी तुमच्या घरी कॉमन मॅन आला का? तुम्ही कधी कॉमन मॅनला भेटलात का तुम्ही राहता मोठमोठ्या लोकांमध्ये. तुम्हाला गरीबाच दुःख काय कळणार असा मिश्किल टोला लगावला आहे.
माझ्या घोटाळ्याची कागदपत्रे उद्या काढा मी तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत होतो. माझी इन्क्वायरी तेव्हाच झाली असती. माझी खुली किताब आहे लपून-छपून नाही, तुमच्याकडे सगळे दप्तर आहे. तर काढा. ज्या पक्षात राहतो त्या पक्षाचा गुंजन करणे आमचं काम आहे. ज्या पक्षात राहतो त्या पक्षातील विरोधी लोकांची ठोकायची असते. माझं काम विरोधक असताना सरकारला टाकायचं होतं. आता सरकारमध्ये आलो तर विरोधकाला ठोकायचं काम आहे.