श्रद्धा कपूरचा मोठा धमाका! Eetha मध्ये दिसणार आजवर कधीही न पाहिलेला अवतार, अंगावर शहारे आणणारा टीझर | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Eetha Teaser Release: महाराष्ट्राच्या लाडक्या लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षावर आधारित ‘ईठा’ या चित्रपटाचा दमदार टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

News18
News18

मुंबई: ‘स्त्री २’ च्या अभूतपूर्व यशानंतर तब्बल दोन वर्षांनी बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर तिचा डंका वाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रद्धा महाराष्ट्राच्या मातीतील एका अशा वादळाची कथा घेऊन येत आहे, ज्याचा टीझर पाहतानाच अंगावर शहारे येतात. महाराष्ट्राच्या लाडक्या लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षावर आधारित ‘ईठा’ या चित्रपटाचा दमदार टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिलीच झलक पाहिल्यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडणार, हे स्पष्ट दिसत आहे.

‘ईठा’च्या टीझरमध्ये दिसला श्रद्धाचा जबरदस्त अवतार

‘ईठा’चा हा टीझर अत्यंत थरारक आणि मनाचा ठाव घेणारा आहे. टीझरची सुरुवात एका लावणीच्या कार्यक्रमापासून होते, जिथे अचानक एक संतापलेला जमाव कलाकारांना थांबवतो आणि ‘ईठा’ला स्टेजवर आणण्याची मागणी करतो. दुसरीकडे, पडद्यामागे ९ महिन्यांची गरोदर असलेली विठाबाई स्टेजवर जाण्याची तयारी करत असते, पण त्याच वेळी तिला प्रसूती कळा सुरू होतात.

बॅकग्राउंडला एक आवाज तिला थांबवतो आणि म्हणतो की, “अशा परिस्थितीत नाचलीस तर जीव जाईल.” यावर श्रद्धाचा भारदस्त डायलॉग ऐकू येतो, “पडल्या-पडल्या मेले तर बिचारी म्हणतील, नाचता-नाचता मेले तर इतिहास घडवेन!” यानंतर ती बाळाला जन्म देते आणि कोणतीही विश्रांती न घेता, अंगात त्राण नसतानाही घुंगरू बांधून थेट स्टेजवर येऊन नाचू लागते. हा प्रसंग इतका जबरदस्त आहे की प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.

पोस्टरने वाढवली होती उत्सुकता

टीझर रिलीज होण्याच्या अवघ्या दोन तास आधी श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे दोन अत्यंत आकर्षक पोस्टर्स शेअर केले होते. तिने लिहिले होते, “तयार आहात…? ‘ईठा’ येतेय. २ तासांत टीझर येतोय.”

विशेष म्हणजे, हा टीझर १९ जून रोजी रिलीज झालेल्या शाहिद कपूर, कृती सेनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘कॉकटेल २’ या चित्रपटासोबत थिएटरमध्ये दाखवण्यात आला होता. चित्रपटगृहात हा टीझर पाहताना प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट केला. श्रद्धाचा नऊवारी साडीतील मराठमोळा श्रृंगार आणि चेहऱ्यावरील हावभाव थक्क करणारे आहेत.

या चित्रपटात केवळ श्रद्धा कपूरच नाही, तर तिच्या सोबतीला अभिनेता रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्यूब हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून अजय-अतुल यांनी चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि एका स्वाभिमानी स्त्रीच्या संघर्षाची कथा २८ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

श्रद्धा कपूरचा मोठा धमाका! Eetha मध्ये दिसणार आजवर कधीही न पाहिलेला अवतार, अंगावर शहारे आणणारा टीझर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *