Ketan Agarwal Death : केतन हत्याप्रकरणात हादरवणारा खुलासा, शेजारच्या मुलाशी सियाचं अफेअर, त्याच्या मदतीने लोहगडावर काढला काटा – Marathi News | Ketan Agrawal Death his Fiancée and Boyfriend Plotted murder on Lohagad Fort


गेल्या आठवड्यात लोहगडावर फिरायला गेलेल्या केतन अग्रावल या तरूण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असलेल्या केतनाच लवकरच विवाह होणार होता. भावी पत्नी, मित्रांसोबत केतन ट्रेकिंगला गेलेला असतानाच, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो 400 फूट दरीत कोसळला अशी माहिती समोर आली होती.. बचाव पथकाने शोधाशोध करून त्याला बाहेर काढल, पण रुग्णालयात नेईपर्यंत खूप उशीर झाला होता. केतनचा आधीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सगळेच हादरले, त्याचे कुटुंबीय शोकाकूल झाले. मात्र आठवड्याभरानंतर या केसला धक्कादायक वळण मिळालं आहे.

केतन अग्रावल याचा पाय घसरून अपघाती मृत्यू झाला नाही तर त्याचा प्रॉपर कट रचून, खून करण्यात आला. त्याची होणारी पत्नी सिया हिनेचे तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने केतनाचा जीव घेतला. लोहगडावर फिरत असताना आजूबाजूला कोणी नाही हे पाहून सियाने आणि तिच्या मित्राने संधि साधली आणि केतनला धक्का दिला. ज्यामुळे तो शेकडो फूट खाली कोसळला आणि त्याचा जीव गेला. पोलिसांच्या तपासात हे उघड झाल्यानंतर सिया व प्रियकाराला अटक करण्यात आली असून आणखी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सियाने केतनला नेमकं कसं संपवलं, त्यांचं काय पाल्निंग होतं हे सगळं पोलिसांनी स्पष्ट सांगितलं. पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल्ल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संपूर्ण हत्याप्रकरणाचा उलगडा केला. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हे हत्याकांड आखलं आणि लोहगडावर तोखून अमलात आणला. सिया ही पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाची मुलगी असून, एवढ्या मोठ्या घरातील, सुशिक्षित तरूणीने प्लान करून, कट रचून एवढा निर्घृण गुन्हा केल्याचे समोर येताच प्रचंड खळबळ माजली.

काय म्हणाले पोलिस ?

18 जूनला लोहगडावरून पडून केतन जखमी झाला. आम्हाला याची मिहीत मिळताच बचाव पथकांसह आम्ही घटनास्थळी धाव घेतली. शोधकार्य सुरू करून दोन अडीच तासांनी त्याला बाहेर काढण्यात आलं, रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथे उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असं पोलिस अधिकारी गिल्ल म्हणाले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली,. या घटनेचा तपास सुरू केल्यावर आम्हाल काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. ही घटना अचानक घडणं शक्य नाही असं नातेवाईकांशी बोलून आम्हाला जाणवलं. कारण केतन हाँ चांगला ट्रेकर होता, याआधीही त्याने बरेच ट्रेक केले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिल्याचे पोलिसांनी नमूद केलं.

शेजारच्या मुलावर होतं प्रेम

मृत केतनाच्या कुटुंबियांनी देखील संशय व्यक्त केला. त्यानंतर तांत्रिक पुरावे तपास आणि साक्षीदारांच्या आधारे जी माहिती मिळाली त्याने वेगळा क्लू समोर आला. यात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरीचं नावं समोर आलं. सियाचे वडील व्यावसायिक आहेत. त्यांच्या दुकानाशेजारीच चेतनच्या कुटुंबाचाही व्यवसाय आहे. त्यातूनच सिया व चेतन यांची ओळख झाली, मैत्रीत रुपांतर झालं आणि कालांतराने दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं, असं पोलिसांनी सागितलं.

केतनशी लग्नाला होता नकार, म्हणून काढला काटा

मात्र सियाचं केतनशी लग्न ठरलं, तिला हे मान्य नव्हतं, 18 जून रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर फिरायला गेले होते, प्लानिंगनुसार, चेतन याने त्यांचा पाठलाग केला. आणि संधी साधून सिया आणि चेतन याने केतनला धक्का दिला, तो दरीत कोसळला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी नमूद केलं. याप्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे समजते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *