मुंबई : राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडकाच लावला आहे. त्यामुळे, गावागावात पानटपरी, लहान सहान दुकानातून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ गायब झाले आहेत. दुधातील आणि अन्न पदार्थीतील भेसळही कमी झाली. तुकाराम मुंढेंच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदार बच्चू कडू यांनीही तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक केलं. सरकार जे करु शकलं नाही, ते तुकाराम मुंढेंनी करुन दाखवलं, बाकीच्या अधिकाऱ्यांनीही यायकडे लक्ष द्यावं असे बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी सभागृहात बोलताना म्हटले.
विधानपरिषदेत 260 च्या कर्जमाफीच्या प्रस्तावावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचं कौतुक केलं. राज्यातील अधिकारी, सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही, असा अनुभव बच्चू कडूंनी सांगितलं. तसेच बाकी अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही बच्चू कडूंनी दिला. बच्चू कडूंनी मंत्री शंभूराजेंना उद्देशून म्हटले, एक सांगतो दुधातील भेसळ थांबली तर हमी भाव मागावा लागणार नाही. मी तुकाराम मुंढेंना सांगतो की त्यांनी दुधाची भेसळ थांबवावी.
कर्जमाफीवरुन बच्चू कडूंची विधानपरिषदेत प्रश्न
उद्धव ठाकरे यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली. कर्जमाफी करुन पण शिव्या खाव्या लागत होत्या. कारण, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त 10 हजार असेल किंवा 5 हजार असेल तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. आत्ताच्या सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे, 2 लाख कर्ज आहे तर दीड लाख रुपये भरा मग आम्ही 50 हजार माफ करेल, असं कसं चालेल. नियमित कर्ज भरणारे असतील तर त्यांच्याबाबत देखील अडचणी आहेत. दिव्यांग शेतकरी, एकल महिला शेतकरी यांची तर विना अट कर्ज माफी करायला हवी, अशी मागणी बच्चू कडू यांनी सभागृहात केली.
मी 75 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. 15 टक्के नफ्यानं कोणता व्यवसाय चालतो. कापूस उत्पादक शेतकरी यांची हीच स्थिती आहे. कर्जमाफी करुन काय करायचं? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला. तसेच, हमी भाव देता येत नसेल तर मागणीचा खर्च करा, उत्पादन खर्च कमी करा, अशी मागणी देखील त्यांनी केलीय
दरम्यान, अनाथांचा नाथ एकनाथ आहे हे सिद्ध झालं आहे. कारण, त्यानेच अपंग कल्याण मंत्रालय सुरू केलं, जे जगातले, देशातले पहिले मंत्रालय आहे.
हेही वाचा
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story