मुंबई : गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटींवर काही दिवसांपूर्वी शासनाने कारवाई केली होती. शासनाचा कोळी समाजाला गिरगाव चौपाटीवरून हद्दपार करायचा डाव आहे. भाजप सरकार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विभागात मांसाहार बंद करायचा आहे. गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा (MNS Girgaon Chowpatty) रोजगार सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. पारंपरिक मासेमारी कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांसाठी फूड स्टॉल बांधून देण्याची मागणी उद्या डी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांकडे करणार आहे. सोबत चौपाटीवरील कोळी बांधव उपस्थित असणार आहेत. याबाबत मनसेकडून सहाय्यक आयुक्तांना पत्र देखील लिहण्यात आलं आहे.(MNS Girgaon Chowpatty)
MNS Girgaon Chowpatty : पत्रामध्ये मनसेनं काय म्हटलंय?
मुंबईचा इतिहास सर्वांनाच परिचित आहे. मुंबईचे मूळ नागरिक हे कोळी बांधव आहेत. सुरुवातीला मुंबईवर या कोळी समाजाचे अधिपत्य होते. पण आज याच मुंबईत कोळी बांधवांना हलाखीचे दिवस बघावे लागत आहेत. गिरगाव चौपाटी येथे कित्येक कोळी कुटुंब वर्षानुवर्षे राहतात. चौपाटीवर मासेमारी करणे हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आणि व्यवसायातील स्पर्धेमुळे पारंपरिक मासेमारीला वाईट वेळ आली आहे.(MNS Girgaon Chowpatty)
गिरगाव चौपाटीवर वर्षानुवर्षे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भेळपुरी स्टॉल उभे आहेत. याच धर्तीवर तिथल्या स्थानिक कोळी बांधवांसाठी मांसाहारी पदार्थाच्या विक्रीसाठी स्टॉल बांधून देण्यात यावेत. जेणेकरून मासे, चिकन, मटन यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करून त्या जागेवर लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून देता येतील व या माध्यमातून कोळी बांधवांची देखील उपजीविका चालू शकेल.
आज गिरगाव चौपाटीवर देशभरातून पर्यटक येतात. पण त्या ठिकाणी फक्त भेळ, पावभाजी, पुलाव यासारखे शाकाहारी पदार्थ उपलब्ध होतात. त्यामुळे मांसाहारी पर्यटकांची प्रचंड गैरसोय होते. या सर्व परिस्थितीचा विचार करता गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांना महापालिकेतर्फे मांसाहारी तयार खाण्याचे पदार्थ विक्रीसाठी स्टॉल बांधून देण्यात यावेत. कृपया आमच्या विनंतीचा सकारात्मक विचार करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती, असं पत्र मनसेच्या वतीने लिहण्यात आलं आहे.
MNS Girgaon Chowpatty : गिरगावमध्ये कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याचे प्रयत्न
मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोळी बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. गिरगावमधील समृद्ध परंपरा जपणाऱ्या कोळी समाजाच्या बोटी हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. या निर्णयाला कोळी बांधवांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात येत असून, “आम्ही इथून जाणार कुठे?” असा थेट सवाल ते उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्षे या परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांनी आपला हक्क आणि उपजीविकेचा प्रश्न पुढे आणत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story