Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 25 To 31 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मेचा (May 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे.  ज्योतिष शास्त्रानुसार, 24 ते 31 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करु नका. तसेच, कोणताही निर्णय घरातील सदस्यांना विचारुनच घ्या. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा समाधानाचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला कोणतीच जास्त अपेक्षा नसणार. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी भाग्याचा आणि सुखाचा असणार आहे. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या कालावधीत पूर्ण करु शकता. मित्रांचा सहवास महत्त्वाचा असेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा लाभाचा असणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण करु शकता. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला हलगर्जीपणा करुन चालणार नाही. नियमित योग, व्यायाम गरजेचा आहे. या आठवड्यात कोणतेही मोठे खर्च करु नका. पैशांचा विनाकारण वापर करु नका. त्यापेक्षा सेविंगवर भर द्या. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवडा काहीसा भावनात्मक असणार आहे. या आठवड्यात कोणताही भावनिक निर्णय घेऊ नका. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामांना आधी प्रोत्साहन द्या. तसेच, मनातील भावना इतरांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं मन हलकं होईल. नवीन काम करण्यास सकारात्मत ऊर्जा मिळेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा लाभदायी असणार आहे. या कालावधीत पैशांची गुंतवणूक करु शकता. तसेच, धार्मिक यात्रेत देखील सहभागी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात एखादा निश्चय ठेवून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना नवीन अनेक संधी चालून येतील. नवीन गोष्टी हाती घेण्यास तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. नात्यातील दुरावा हळुहळू दूर होईल. नवीन लोकांशी भेटीगाठी वाढतील. तसेच, मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

हे ही वाचा :   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : Logic आणि Ego चं कॉम्बिनेशन असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक; बोलण्यात एकदम पटाईत, कधीच हार मानत नाहीत

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *