Last Updated:
टीम इंडियाने हा सामना 66 धावांनी जिंकला होता.या विजयासह टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीचा बदला घेतला आहे.
India A vs Sri Lanka A : दाम्बुला इंटरनेशनल स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 66 धावांनी पराभव करत फायनलचा सामना जिंकला.टीम इंडिया अ ने प्रथम फलंदाजी करताना 377 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका अ फक्त 311 वर ऑलआऊट झाली.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 66 धावांनी जिंकला होता.या विजयासह टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीचा बदला घेतला आहे.
टीम इंडियाने दिलेल्या 377 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण अविष्का फरांडो 3 तक निरोशन डिकवाला 25 आणि नुवानिंदू फरनांडो 21 वर बाद झाला.हे तीन विकेट पार पडल्यानंतर श्रीलंकेचा डाव अडचणीत सापडला होता.
त्याच्यानंतर सदीरा समराविक्रमा आणि कॅप्टन सहन अराचिंगे मैदानात आले होते. यावेळी सदीराने 52 धावांची खेळी केली.त्याच्यानंतर रविंदु फरनांडो 19 वर बाद झाला. त्यानंतर कॅप्टन सहन अराचिंगे देखील 38 वर बाद झाला. श्रीलंकेच्या 6 विकेट पडल्यानंतर ते सामना लगेच हारतील असे वाटत होते.पण वानुजा सहन आणि वियासकांथने श्रीलंकेचा डाव सावरला होता. दोघांनी मिळून श्रीलंकेला विजयाशी आशा दाखवली होती. पण वियासकांथ 39 वर बाद होताच सगळा खेळ संपला. त्याच्यापाठोपाठ वानुजा सहन 62 वर बाद झाला.त्यानंतर शेवटचे काही खेळाडू जास्त काही करू शकले नाही त्यामुळे श्रीलंका टीम 311 वर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 66 धावांनी जिंकला होता.
टीम इंडियाकडून यश ठाकूर आणि विपराज निगमने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या होत्या.अनुकुल रॉयने 2,अशोक शर्मा आणि तिलक वर्माने एक विकेट घेतली होती.
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक 94 आणि तिलक वर्माने 67 आणि अनुकूल रॉयने 15 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 9 विकेट गमावून 377 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे या सामन्याआधी मागच्या सामन्यात श्रीलंकने टीमने वैभव सूर्यवंशीला धक्काबुक्की केली होती. या धक्काबुक्कीचा बदला टीम इंडियाने आज घेतला आहे.
Mumbai,Maharashtra
