ENG vs NZ Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडला दणका, कर्णधार जो रूटने सांगितलं काय चुकलं?Image Credit source: England Cricket Twitter
वर्ल्डकप 2025-2027 स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मात दिली आणि 1-1 ने बरोबरी साधली. दुसर्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इ्ंग्लंडच्या बाजूने लागला होता आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय न्यूझीलंडने चुकीचा ठरवला. जो रूटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला 253 धावांनी लोळवलं. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडने 391 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 291 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 100 धावांची आघाडी मिळाली. या धावांच्या पुढे खेळताना न्यूझीलंडने त्यात 362 धावा जोडल्या आणि विजयासाठी 462 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 209 धावांवर बाद झाला आणि हा सामना न्यूझीलंडने 253 धावांनी जिंकला.
पराभवानंतर काय म्हणाला जो रूट?
इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला की, ‘न्यूझीलंडला श्रेय द्यायलाच हवं. मला वाटतं ते खूप छान खेळले. असे अनेक प्रसंग होते जेव्हा सामना बरोबरीत होता आणि त्यांनी ते निर्णायक क्षण जिंकले. त्यामुळे, त्यांच्या शानदार कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. मालिकेत अजूनही 1-1 अशी बरोबरी आहे आणि ट्रेंट ब्रिजवर अजून सर्व काही पणाला लागले आहे. पण मजा आली. त्या वातावरणात परत येऊन बॅझसोबत काम करायला मला खूप आनंद झाला. तुम्हाला माहीत आहे, या आठवड्यात तो अनुभव घेणं खूप छान होतं. त्यामुळे, संघात येणाऱ्या त्या तरुण खेळाडूंसाठी ही एक उत्तम संधी आहे. आणि मला वाटतं की या पाच दिवसांत खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आणि आपल्याला फक्त जास्त काळ अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागेल.’
‘आपल्याला मैदानावर थोडे अधिक सतर्क राहण्याची आणि संधी आल्यावर ती साधण्यासाठी तयार राहण्याची खात्री करावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध, बऱ्यापैकी चांगल्या खेळपट्टीवर, आठ संधी गमावता किंवा विशेषतः झेल चुकवता, तेव्हा ते तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरतं. आपल्याला ते धडे शिकायला हवेत, त्या क्षेत्रांमध्ये थोडे अधिक हुशार आणि चांगले बनायला हवे.’, असं जो रूट म्हणाला.
‘मला वाटते, पुन्हा एकदा, विशेषतः ग्लेन फिलिप्सला श्रेय द्यायला हवे, ज्या प्रकारे तो त्या संध्याकाळी खेळला. जोफ्राचा तो एक अत्यंत भेदक स्पेल होता, मला वाटले, तो संपूर्ण कसोटी सामन्यात उत्कृष्ट होता.’, असंही जो रूट याने पुढे सांगितलं.