Tejaswini Pandit: “चला पुढच्या 5 वर्षात सगळे मरुया!”; तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ विधानाने खळबळ; नेमकं काय घडलंय? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अशी भयंकर पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे.

News18
News18

मुंबई: आपल्या सडेतोड अभिनयाने आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वाने मराठी चित्रपट अन् वेब सिरीज विश्वात हक्काचे स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. तेजस्विनी केवळ ग्लॅमरपुरती मर्यादित नसून, ती नेहमीच चालू घडामोडींवर आणि राजकीय-सामाजिक परिस्थितीवर उघडपणे आपली मते मांडत असते. मात्र, नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अशी भयंकर पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे. तिने लिहिलेल्या अवघ्या एका वाक्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.

नेटकऱ्यांच्या भुवया उंचावणारी इन्स्टाग्राम स्टोरी

नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तेजस्विनीने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. पण त्या व्हिडिओपेक्षा तिने दिलेले कॅप्शन थक्क करणारे होते. तिने अत्यंत गंभीर स्वरात लिहिले होते, “चला पुढच्या ५ वर्षात सगळे मरुया!” हा तिच्या आगामी चित्रपटाचा काही प्रोमो नाही, पण जेव्हा लोकांनी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला, तेव्हा त्यांना तेजस्विनीच्या मनातील तीव्र भीती आणि संतापामागचे खरे कारण समजले.

पाणी टंचाई आणि विनाशाची धडकी भरवणारा व्हिडीओ

तेजस्विनीने शेअर केलेला व्हिडिओ हा भारतात वेगाने बदलत असलेल्या पर्यावरणावर आणि पाण्याच्या भीषण टंचाईवर आधारित आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने धोक्याची घंटा वाजवताना म्हटले आहे, “भारतासमोरील सर्वात मोठे संकट हे नाही की येथील पाणी अचानक संपून जाईल. तर खरी भीती ही आहे की, सतत जाणवणाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळे देशाची अन्न सुरक्षा, आर्थिक उत्पादकता, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक स्थैर्य पूर्णपणे धोक्यात येईल.”

व्हिडिओमध्ये पुढे भूतकाळाचा दाखला देत सांगितले आहे की, इतिहास साक्षी आहे की जेव्हा एखादी मानवी संस्कृती विनाशाच्या उंबरठ्यावर असते, तेव्हा तिथल्या लोकांना संकट समजतच नाही. लोक सुकलेल्या विहिरी, नापीक शेती, प्रदूषित नद्या आणि शहरांमधील गर्दी या वेगवेगळ्या समस्या समजतात; पण प्रत्यक्षात ही एकाच मोठ्या विनाशाची वेगवेगळी लक्षणे असतात. भारताचे पाण्याचे भविष्य आता आपण पाणी वाचवण्याचा वेग वाढवतो की ते संपवण्याचा, यावरच अवलंबून आहे.

निसर्गाचा होत असलेला हा ऱ्हास पाहून तेजस्विनी प्रचंड अस्वस्थ झाली असून, तिने उपरोधिकपणे “सगळे मरुया” असे लिहून झोपलेल्या समाजाला आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पर्यावरणप्रेमी तिच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/

Tejaswini Pandit: “चला पुढच्या 5 वर्षात सगळे मरुया!”; तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ विधानाने खळबळ; नेमकं काय घडलंय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *