Raj Thackeray on Operation Tiger: अमित शाह 2029 ला पंतप्रधान होण्याच्या तयारीत, म्हणून 6 खासदार शिंदे गटात पाठवले; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य


Raj Thackeray on Operation Tiger: आगामी लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये (BJP) न जाता शिंदे गटात गेले. या सगळ्यामागे अमित शाह (Amit Shah) यांना पंतप्रधान करण्याच्यादृष्टीने रणनीती आखण्यात आल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांना 2029 च्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यादृष्टीने मतदार यादी आणि इतर बाबींवर लक्ष ठेवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या. (Operation Tiger news)

यावेळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’संदर्भातही भाष्य केले. अमित शाह यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी’ऑपरेशन टायगर’ राबवले होते. त्यानुसार ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले होते. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी एका वेगळ्याच पैलूकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची ? भारतात सत्ता कोणाची ? भाजपची ना, मग हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे 6 खासदार भाजपमध्ये गेले असते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

सध्याच्या घडीला भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे. आतून सगळं पेटलेलं आहे. नरेंद्र मोदी असल्यामुळे सध्या सगळं शांत आहे. पण काहीजण बोलत आहेत की, येत्या काही दिवसांमध्ये केंद्रात आणि अनेक ठिकाणी गोंधळ होईल. त्यामुळे तयार व्हा, ज्यावेळी वेळ येईल तेव्हा तुम्ही जमिनीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. 

Raj Thackeray on BJP: जनगणना आणि दुबार मतनोंदणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा: राज ठाकरे

जनगणना ३० जूनपासून सुरू होत आहे. हे करताना त्या अधिकाऱ्यांसोबत भाजपची लोकं आहेत का, हे बघा.  कोण येतजात आहे, काय बघत आहे, यावर लक्ष ठेवा. जनगणना करताना गप्पांच्या ओघात हा आपला मतदार आहे की नाही, याची नोंदणी केली जात आहे का, हे बघा. पक्षातील सर्वांना माझी विनंती आहे की, या सगळ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. तीन वर्षात काय गायब होईल खालून हे कळणारही नाही. 

यासाठी आपल्या पक्षाकडून चांगली सिस्टम लावली जाणार आहे. दुबार मतदार दोनपैकी एका जागेवर नाव ठेवणार. पण एकाचवेळी आपल्या कडे मतदान होत नाही, मग युपी बिहारचे काय करणार ते इथेही मतदान करणार आणि गाड्या भरून तिथे जाऊन मतदान करणार. 2018 ला मी बोलत होतो की निवडणुकांवर बहिष्कार टाका. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेले नसते, सत्तेपासून हे ही दूर होतील. ज्यांनी ६० वर्षे राज्य केले या देशावर, त्या काँग्रेसची परिस्थिती काय हे बघा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

स्वाभिमान विकला की उरतात ती फक्त जिवंत प्रेतं; एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य, फुटीर खासदारांना सुनावलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *