Last Updated:
रत्नागिरीतील गणपतीपुळे बीचवर पर्यटनासाठी आलेले 5 जण समुद्रात बुडून बेपत्ता, सकाळी 10 वाजता घटना, सर्च ऑपरेशन आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
राजेश जाधव, प्रतिनिधी रत्नागिरी: विकेण्डमुळे समुद्रकिनाऱ्यावर अजूनही एन्जॉय करायला लोक जात आहेत. कोकणातलं गणपतीपुळे हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळ्यात मंदिरात दर्शन घेऊन मग बीचवर मजा करायला गेलेल्यांपैकी 5 जण समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. पर्यटनासाठी आलेले पाच जण एकाच वेळी बुडाले. दरम्यान पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गणपतीपुळ्याच्या समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने हे पर्यटक बुडाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी 10 वाजता ही घटना घडली. सर्च ऑपरेशन सुरू आहे. गणपतीपुळ्याचा समुद्र आधीच धोकादायक मानला जातो. त्यात आनंद आणि मजेसाठी गेलेले पर्यटक बुडाल्याने खळबळ उडाली आहे. पाचही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
Jun 20, 2026 11:28 AM IST
