एकनाथ शिंदेंच्या भर सभेतील विधानाने खळबळ, बंडखोर खासदारांवर मोठं भाष्य; म्हणाले वाघ नेहमी… – Marathi News | Shivsna anniversary day eknath shinde first comment on uddhav thackeray ubt party split comments on six mp revolt


Uddhav Thackeray Speech : शिवसेना पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा तर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केलेली आहे. हे सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे आजच्या कार्यक्रमात नेमकं काय बोलणार? शिंदे या खासदारांच्या प्रवेशाची घोषणा करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता शिंदे यांनी या खासदारांबाबत अप्रत्यक्षपणे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर भविष्यात मोठं काहीतरी घडणार असून ठाकरेंचे खासदार शिंदे गटात लवकरच सामील होतील, असा अंदाज लावला जात आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

साठ वर्षांपूर्वी आपल्या शिवसेनेची स्थापना झाली. या हिरक मोहोत्सवानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज समोर भगवं वादळ उठलं आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व नेते, मंत्री, उपनेते, खासदार, आमदार माझे ऐश्वर्य आहे. समोर बसलेले माझे शिवसैनिक हे माझी संपत्ती आहे. बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. मी नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण येणार, काय होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण आज हा वाघ तुमच्यासमोर उभा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पिक्चर अजून बाकी आहे

तसेच, आज मी बघतोय की काल परवापासून कुछ कुत्ते रोज भौकं राहे है. कुत्रे झुंडीने भुंकतात. वाघ एकटाच येतो. कुभे भुंकतात टायगर शिकार करतो. आमची ही शिवसेना आहे. ही शिवसेना आज महाराष्ट्रात पाहतोय की बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. पुढे पुढे बघा काय होतंय, असे सूचक विधानही शिंदे यांनी केले.

हिंदुत्त्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना

पुढे बोलताना , शिवसेनाचा जन्म मराठी माणसासाठी झाला. हिंदुत्त्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोह्यांवर प्रहार म्हणजे शिवसेना, माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना असल्याचे शिंदे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *