उद्धव ठाकरे भेटत नाहीत, मग गधड्या तू कसा निवडून आलास, काय म्हणाले उद्धव ठाकरे – Marathi News | “Thackeray doesn’t meet people—so how did *you* get elected, you fool?” — What Uddhav Thackeray said.


उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा एकदा फुटीला सामोरे जावे लागले असताना शिवसेनेचा आज हिरकमहोत्सवी वर्धापन दिवस साजरा झाला. षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या या वर्धापन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. आपण बंगल्यात बसून असतो. बाहेर जाऊन फिरत नाही. उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत अशा होणाऱ्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की भाजपकडे दोन तृतियांश बहुमत आहे. जेवढे आहेत ते सगळेच बाहेरचे आहेत. तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही आमची का पळवताय ? तुमच्या वांझोटेपणावर तुम्ही इलाज करा. तुमची पोरं पळवणारी टोळी आहे. आमची पोरं पुरवणारी टोळी नाही. किती पळवणार असाही सवाल यावेळी ठाकरे यांनी केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे भेटत नाही. आदित्य फिरत नाही. मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला. प्रत्येक लोकसभेत सहा ते दहा सभा घेतल्या तेव्हा निवडून आले. मी मंत्री केलं. आमदार केलं. खुर्ची दाखवली.हा माझा गर्व असेल. मी गर्व दाखवणार नाही. उद्धव ठाकरेंना किंमत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किमत आहे. शहरात जंगल तोड सुरू आहे. शहरात वडा पाव माहीत आहे. वट सावित्रीचा वड गेला. वड मोठा असतो. एखादा लांबून नमस्कार करतो. पारंबीला वाटतं मलाच केला. तुला नाही केला. तो खोडाला केला. मातोश्रीवर शिंतोडे उडवत आहेत. ही कोणती अवलाद आहे. शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमान पेरला ही भेसळ कुठून आली असाही सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *