ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का! संपूर्ण जिल्ह्यात सगळे… बंडखोरीनंतर धाराशिवमध्ये एकच खळबळ! – Marathi News | Dharashiv ubt leader ranjit patil opposed omraje nimbalkar said no single karyakarata is with omraje nimbalkar


Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. हे सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होणार आहेत. सर्व कायदेशीर अभ्यास करूनच या खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा शिंदे गटाकडून केली जाणार आहे. ही बंडखोरी होताच स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर बंडखोर खासदारांचे पुतळे जाळण्यात आले. बंडखोरीविरोधात जोडेमारो आंदोलनही केल्याचे दिसून आले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निष्ठांवत म्हणून ओळख असलेले धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यापुढे त्यांच्याच जिल्ह्यात मोठे संकट उभे राहिले आहे.

धाराशिव जिल्ह्यात नेमकं काय घडतंय?

ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी करताच धाराशिवधील ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनीच आता खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट आव्हान दिले आहे. तुम्ही Y+ सुरक्षा हटवून मतदारसंघात या. जनता तुम्हाला धडा शिकवेल, असं खुलं आव्हान रणजित पाटील यांनी ओमराजे यांना केलंय.

उद्धव ठाकरेंचे मला फोन येत होते

तसेच, 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचाच खासदार होईल, असा विश्वास व्यक्त करत ज्या निष्ठेने तुम्ही महाराष्ट्रात परिचित होतात त्या निष्ठेचे काय फळ दिले, असा रोखठोक सवालही त्यांनी विचारला. आज तुम्ही गद्दार म्हणून ओळखले जात आहात. चार दिवसांखाली जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचे मला फोन येत होते. धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचा एकही पदाधिकारी ओमराजे यांच्या बरोबर जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे गटाचा एकही कार्यकर्ता…

खासदार संजय राऊत यांनी गद्दारांना तुडवा असा आदेश दिल्यावरच ओमराजे निंबाळकर यांना सुरक्षा देण्यात आली आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने स्वतःच्या खिशातील पैसे देऊन तुम्हाला निवडून दिले. परंतु तुम्ही जनतेच्या मताची प्रतारणा केली, अशी टीका रणजित पाटील यांनी केली. तसेच 2024 ला मी स्वतः आमदार होत असताना फक्त ओमराजेंच्या सांगण्यावरुन मी उमेदवारी अर्ज मागे घेतला, हे सांगायलाही रणजित पाटील विसरले नाहीत. ठाकरे गटाचा एकही कार्यकर्ता ओमराजे यांच्या मागे राहणार नाही, असा विश्वास रणजित पाटील यांनी व्यक्त केल्याने आता ओमराजे आपला गड कसा राखणार, कार्यकर्त्यांची फळी कशी निर्माण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *