Uttamrao Jankar : ‘पवार साहेबांचे वय आणि पक्षापुढील अडचणी पाहता आमदार फुटले तर ते…’; पवारांचा विश्वासू शिलेदाराच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले…


Uttamrao Jankar : एका बाजूला राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची (Shivsena Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना आता शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एक बॉम्ब फोडत शरद पवार (Sharad pawar) गटाचे आमदार फुटले तर ते अजित पवार (Ajit pawar) गटात जातील, शिंदेसेनेत कशाला जातील? असा सवाल केला आहे. मात्र सध्या सत्ताधाऱ्यांना आमदारांची गरजच नसून 70 ते 80 टक्के बहुमत त्यांच्याकडे असल्याचा दावाही करीत आता आमदार फोडाफोडी होणार नसल्याचे संकेत जानकर (Uttamrao Jankar) यांनी दिले आहेत.

Uttamrao Jankar on Ram Satpute: राम सातपुते यांची पक्ष काळजी घेईलच, त्यांना राज्यपाल करेल

विधान परिषदेचे मतदान संपताना माळशिरसचे भाजप माजी आमदार आणि उत्तम जानकर यांचे कट्टर विरोधक राम सातपुते यांनी जानकर व मोहित्यांचे वाद झाल्यामुळे ते आमच्याकडे आले. पण ते आमचे कट्टर विरोधक आहेत असा दावा केला होता. ते दोघेही एकत्र आले तरी भाजप त्यांचा पराभव करणार, असे वक्तव्य सातपुते यांनी केले होते. याबाबत सातपुतेंशी खिल्ली उडवताना त्यांना एवढं चिडायचे कारण काय? पक्ष त्यांची काळजी घेईलच ना. सातपुते यांना राज्यपाल करेल, असा टोला लगावत त्यांचा प्रवास बीड ते माळशिरस झालेला आहे. आता त्यांना पुढे दुसरीकडे कुठेतरी त्यांचा प्रवास सुरू करावा लागेल, असाही टोला उत्तम जानकर यांनी लगावला आहे.

Uttamrao Jankar : शरद पवार गटापुढे साहेबांचे वय आणि इतर अनेक अडचणी, म्हणून

सध्या राज्यात ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लायन असे शब्द कानावर पडत आहेत. मात्र असे काही होईल असे वाटत नाही, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा पुढे साहेबांचे वय आणि इतर अनेक अडचणी आहेत. अशा वेळेला ज्यांना फुटायचे आहे ते शिंदे कशाला जातील? असा सवाल करीत फुटणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जातील असे संकेत दिले. मात्र सध्या सत्ताधाऱ्यांना याची गरजच नसून त्यांच्याकडे खूप मोठी मेजॉरिटी असल्याने आमदार फोडतील असे चित्र नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल झालेल्या मतदानात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांची निवडणूक सोडून दिल्यात जमा होती आणि ती म्हटले तसे एकतर्फी झाली. वसंतराव देशमुख यांना शंभर ते दीडशे मते जास्तीत जास्त मिळू शकतील, असा दावा करीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे संकेत दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *