Vat Purnima 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, वट सावित्रीचे व्रत 29 जून 2026 रोजी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला (Vat Purnima) आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार, सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला. त्यानुसार, वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगांच्या साड्या परिधान कराव्यात? तसेच, या व्रताचं महत्त्व नेमकं काय? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी घालण्याचे शुभ रंग आणि त्याचं महत्त्व
हिरवा रंग – हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो. तसेच, या रंगामुळे घरात सुख-शांती वाढते.
लाल रंग – लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. हा रंग पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत शुभकारक मानला जातो.
पिवळा रंग – पिवळा रंग हा ज्ञान, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्य वाढवण्यास मदत करतो. तसेच, या रंगामुळे एक प्रकारे सकारात्मकता येते.
केशरी रंग – केशरी रंग हा उत्साह, धैर्य आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करुन आत्मविश्वास वाढवतो.
गुलाबी रंग – गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज वाढवतो.
वटपौर्णिमेच्या दिवशी ‘या’ रंगांच्या साड्या परिधान करा
महिलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि गुलाबी रंगाची साडी परिधान करु शकता.
वटपौर्णिमा व्रताचं महत्त्व
वटवृक्षाची पूजा केल्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते. तसेच, कुटुंबाचे कल्याण होण्यास मदत होते. तसेच, या दिवशी सौभाग्यवती महिलांनी उपवास आणि पूजा केल्यास अखंड सौभाग्य लाभते. वट पौर्णिमेचे व्रत केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख-समृद्धी लाभते. वटपौर्णिमेचं व्रत पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि बंध अधिक घट्ट करते. या व्रतामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते. तसेच, आर्थिक उन्नतीचे योग जुळतात.
वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा शेवटचा आठवडा गेमचेंजर; 5 राशींना श्रीमंतीचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report