Operation Tiger : खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा


वाशिम : शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर (Operation Tiger) यशस्वी झाल्यानंतर आता ठाकरेंच्या आमदारांवरही त्यांचा डोळा असल्याचं दिसतंय. त्याला पुष्टी देणारं वक्तव्य शिंदेंच्या आमदाराकडून करण्यात आलं आहे. ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ आाता आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत येतील, शिंदें साहेबांचं नियोजन एकदम करेक्ट आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केल्याचं बच्चू कडू म्हणाले. 

ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली असून शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत. या सहा खासदारांनी स्वतंत्र गट निर्माण केला असून तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

Bachchu Kadu On Eknath Shinde : शिंदेंचं नियोजन व्यवस्थित 

याच घडामोंडींवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार आल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आमदारही येणारच आहेत. त्या बाबतील शिंदे साहेबांचं नियोजन एकदम व्यवस्थित असतं. शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. 

या राज्यामध्ये सर्वसामान्य, शेतकरी, गरीबांचा, दिव्यांगांचा खरा माणूस म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. मी जसा त्यांच्या सेवाभावी वृत्तीच्या मोहात पडलो तसे अनेकजण त्यांच्या मोहात आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.  

Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना सर्वाधिक खासदारांचा पक्ष

शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंचे तब्बल सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर राबवलं. मात्र ऑपरेशन टायगरबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचं दिसतंय. बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबत शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच दिवशी संसदेकडून विशेष परिपत्रक जारी करण्यात येणार असून सहा खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण होत असल्याचं जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

बंड केलेल्या या सहा खासदारांनी त्यांच्या सह्यांचं पत्र हे लोकसभा अध्यक्षांना आधीच दिलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांचा आकडा 7 वरुन 13 वर जाणार असून त्यांची शिवसेना सर्वाधिक खासदार असलेला महाराष्ट्रातील पक्ष ठरणार आहे.

Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

Uddhav Thackeray Shivsena MP List : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?

1. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)

3. राजाभाऊ वाजे (नाशिक)

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *