“सुरुवातीला मी इतका शिस्तबद्ध नव्हतो, पण या भूमिकेमुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता आला. सूर्या आणि त्याची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल,” असा विश्वास शाल्वने व्यक्त केला आहे. शाल्वची मेहनत आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी भावनिक प्रेमकथा यामुळे ‘विसरू नको तू मला’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.