रेश्मा I am Proud of You, जेव्हा एक कामवाली बाई थायलंड ट्रिपला जाते, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल | व्हायरल न्यूज (Viral News in Marathi)


Last Updated:

कामवाली बाई म्हटलं तर घरोघरी जाऊन इतरांची धुनी भांडी आणि नाश्ता,जेवणे करणे ही काम आलंच ही काम आटोपून आपल्या घराचा गाडा हाकणे,या सगळ्या गोष्टी बोलायला जितक्या सोप्प्या वाटतात तितक्याच खूप कठीण आहे.

News18
News18

Viral Video News : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ हे मनोरंजक असतात तर काही व्हिडिओ खूपच इमोशनल असतात. असाच एक इमोशनल व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक कामवाली बाई थायलंड ट्रिपला गेल्याचे सांगते. या ट्रीपला गेल्यावर तिला बोलण्यापासून ते राहण्यापर्यंत तिला काय अडीअडचणी आल्या? या सगळ्या गोष्टीचा उलगडा तिने एका व्हिडिओमध्ये केला आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

कामवाली बाई म्हटलं तर घरोघरी जाऊन इतरांची धुनी भांडी आणि नाश्ता,जेवणे करणे ही काम आलंच ही काम आटोपून आपल्या घराचा गाडा हाकणे,या सगळ्या गोष्टी बोलायला जितक्या सोप्प्या वाटतात तितक्याच खूप कठीण आहे.या महिलांची अक्षरशा तारेवरची कसरत होते. या कसरतीत त्या प्रचंड थकतात पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या आयुष्यात न थकण्याचा नियम लागू होतो.

दरम्यान अशीच थकून भागून असलेली कामवाली बाई थायलंडला पोहोचली आहे.तुम्हाला वाटेल घरकामानिमित्त ती कामाला गेली असेल पण तसे अजिबात नाही आहे. ही कामवाली बाई चक्क ट्रिपला थायलंडला गेली आहे. या ट्रिपचा अनुभव तिने व्लॉग करून सांगितला आहे.

या घरकाम करणाऱ्या महिलेचे नाव रेश्मा आहे. ती प्रसिद्ध डिजिटड क्रिएटर अनिश भगत यांच्याकडे घरकाम करते.त्यांच्यासोबत ती थायलंडला गेली होती.यावेळी ती अनिशसोबत थायलंडला पोहोचल्यावर तिला एक संपूर्ण दिवस एकटीला घालवायला सांगतो. विशेष म्हणजे यावेळी तो तिला स्वत:चा एक व्लॉग बनवायलाही सांगतो. यामध्ये ती आपल्या ट्रिपचे अनुभव शेअर करते.

मी फक्त घरकाम करणारी बाई आहे. मी इथे कोणालाही ओळखत नाही. मला त्यांची भाषाही समजत नाही आणि मला वाचताही येत नाही, असे ती तिच्या व्लॉगमध्ये म्हणते. पण ती पुढे सांगते, मला स्वयंपाक करता येतो, म्हणून मी पुरणपोळी बनवली आहे, ज्यामुळे मला मित्र बनवायला मदत मिळेल, असे रेश्मा सांगते.

व्हिडिओत रेश्मा तिची आवडती साडी नेसून एकटीच थायलंड फिरायला बाहेर पडलेली दिसली. देशात नवीन मित्र बनवण्यासाठी तिने पुरणपोळीने भरलेला डबा सोबत घेतला होता. तिच्या पहिल्या-वहिल्या व्लॉगमध्ये रेश्माने सांगितले की, अनिशने तिला तिच्या आवडीच्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या, पण ती म्हणाली, “माझी आवड काय आहे याचा मी कधी विचारच केला नाही. मला त्यासाठी कधी वेळच मिळाला नाही.”

त्यानंतर ती बँकॉकच्या एका सुंदर मंदिरात पोहोचली आणि एका जर्मन माणसाला थोडी पुरणपोळी देऊन तिने त्याच्याशी मैत्री केली. “मी खूप घाबरले होते. मी पुरुषाशिवाय कधीच बाहेर पडले नव्हते,” असे ती सांगते. नंतर रेश्मा एका सेव्हन-इलेव्हनमध्ये गेली, जिथे तिची भेट पोपो नावाच्या एका महिला इन्फ्लुएन्सरशी झाली, जिने तिला तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. वाटेत दोघींनी गप्पा मारल्या आणि एकत्र जेवणाचा आनंद घेतला. ती म्हणाली, “माहित नाही की जबाबदाऱ्यांमुळे आपण स्त्रिया स्वतःकडे का दुर्लक्ष करतो.”

चित्रपटांप्रमाणेच एक पुस्तक वाचून आणि मँगो स्टिकी राईसचा आस्वाद घेत तिने दिवसाचा शेवट केला. त्या अनुभवावर विचार करत ती स्वतःशीच म्हणाली, “रेश्मा, मला तुझा अभिमान वाटतो.”

रेश्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण इमोशनल झाले आहेत. तर काहींनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या/Viral/

रेश्मा I am Proud of You, जेव्हा एक कामवाली बाई थायलंड ट्रिपला जाते, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *