Tv Serial Trolling: कानफाडात लगावली, जबरदस्ती जवळीक अन् .. लोकप्रिय मलिकेत रोमान्सच्या नावाखाली घरगुती हिंसा दाखवताच प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट


Hindi TV Serial Mahadev And Sons Trolling: एकेकाळी टीव्हीवरील सासू-सून मालिकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहायचे. त्या मालिकांमधील कथा घरगुती आणि वास्तवाशी जोडलेल्या असल्यामुळे प्रेक्षकांना त्या आपल्याच आयुष्याचा भाग वाटायच्या. मात्र, आता अनेक मालिकांनी मर्यादेचा विसर पडल्याचं दिसतंय. घरातील फुटकळ वादविवाद दाखवणं एकवेळ ठीक पण आता मालिकेत अश्लीलता आणि टोक्सिक नातेसंबंधांना जास्त महत्त्व दिलं जात असल्याची टीका होऊ लागली आहे. अशातच कलर्स टीव्हीवरील ‘महादेव अँड सन्स’ (Mahadev And Sons) ही मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

या मालिकेच्या ताज्या भागात दाखवण्यात आलेल्या हिंसक दृश्यांवर प्रेक्षकांनी सडकून टीका केली आहे. प्रणित मोरेच्या ‘370 बिर्याणी’ डॉ सेजलेची मृतदेहावरील असंवेदनशील प्रतिक्रिया चर्चेत असताना प्रेक्षक आता सगळ्या प्रकारच्या कंटेटवर बारकाईनं लक्ष देत आहेत. दरम्यान, मालिकांमध्येही आता घरगुती हिंसाचाराला रोमान्सचं स्वरूप देऊन दाखवल्यामुळे प्रेक्षकांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेत शक्ती आनंद, गरविता साधवानी आणि स्नेहा वाघ मुख्य भूमिकेत आहेत. 

नेमकं दाखवलं काय या मालिकेत ?

ताज्या एपिसोडमध्ये मुख्य पात्र धीरज, रज्जीला कानशिलात ठेऊन देतो. तिला ढकलतो, बर्फाने भरलेल्या बादलीत फेकतो आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. या गोंधळात गरम इस्त्रीमुळे तिचा हातही भाजतो. रज्जी वेदनेने ओरडत असतानाही धीरज तिचं काही ऐकत नाही. उलट तिच्याबद्दल त्याच्या मनात फक्त द्वेष असल्याचं तो स्पष्ट सांगतो.

सोशल मीडियावर संतापाची लाट

या दृश्यांनंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांचा संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी हे रोमान्स नसून स्पष्ट अत्याचार असल्याचं म्हटलं आहे. काहींनी अशा वर्तन करणाऱ्या पात्राला तुरुंगात असायला हवं, अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी, “ज्याने तिला वाचवलं, तोच आज अत्याचार करताना दाखवणं धक्कादायक आहे,” असं म्हणत या मालिकेला ट्रोल केलं.

 

याशिवाय, प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांवरही टीका केली आहे. “आजचा प्रेक्षक जागरूक आहे. टॉक्सिक नातेसंबंध आणि चुकीच्या कौटुंबिक वर्तनाला आता स्वीकारलं जाणार नाही,” असं अनेकांनी म्हटलं. TRP साठी अशा प्रकारचा कंटेंट दाखवणं चुकीचं असल्याचंही अनेकांनी नमूद केलं.दरम्यान, ‘महादेव अँड सन्स’ ही मालिका यापूर्वीही चर्चेत आली होती. अभिनेत्री मानसी साळवीने मालिका सोडल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी निर्मात्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या मते, निर्मात्यांनी तथ्यांचा विपर्यास करून चुकीची माहिती पसरवली होती.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *