Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर असते गुरु ग्रहाची कृपा; पैसा, नोकरी, प्रेम सगळ्यात असतात अव्वल, ‘ही’ गोष्ट ठरते खास


Numerology of Mulank 3 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचा (Mulank) एक स्वामी ग्रह आहे. त्यानुसार, मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु ग्रहाला ज्ञान, धन, सन्मान आणि भाग्याचा कारक ग्रह मानतात. जर मूलांक 3 असणारे लोक गुरु ग्रहाला खुश ठेवण्यासाठी काही खास उपाय किंवा व्रत करतील तर त्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवारचा उपवास मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी फार खास मानला जातोय. 

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12 आणि 21 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या मूलांकाचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यानुसार, गुरुवारचा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरु ग्रह बृहस्पतीला समर्पित आहे. मान्यतेनुसार, या दिवशी विधीवत पूजा, व्रत केल्यास गुरु ग्रहाची विशेष कृपा प्राप्त होते. ज्यो लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रह कमजोर असतो त्यांना जीवनात शिक्षण, करिअर, विवाह आणि मुलं तसेच, आर्थिक बाबतीत अनेक अडथळे येऊ शकतात. 

या दिवशी उपवास केल्यास मिळतील ‘हे’ फायदे 

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवारच्या दिवशी उपवास केल्याने गुरु ग्रह मजबूत होतो. यामुळे तुमच्या शिक्षण आणि करिअरमध्ये तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यता वाढतात. लग्नात येणारे अडथळे दूर होतात. घरातील वातावरण आनंदी राहतं. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसते. समाजात चांगला मान-सन्मान मिळतो. 

‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या 

गुरुवारच्या दिवशी केस आणि नखं कापू नयेत. तसेच, घरात विनाकारण वाद घालू नका. पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करा. तसेच, गरजूंना मदत करा. हे उपाय या दिवशी केल्यास लाभदायी ठरतील. 

हे ही वाचा :                                                                                                                     

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Guru Pushya Nakshatra Parivartan : शनिच्या नक्षत्रात गुरुची होणार एन्ट्री! आज रात्रीपासूनच 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशांत खेळतील राशी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *