Sushma Andhare : ‘ओम दादा, फक्त खासदार म्हणून नाही तर आमच्या कुटुंबातला सदस्य, आमचा भाऊ म्हणून….; सुषमा अंधारेंची खासदार ओमराजे निंबाळकरांना भावनिक साद, म्हणाल्या….


Sushma Andhare on Omraje Nimbalkar :  ‘ओम दादा, तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल, अशी अपेक्षा आहे. फक्त खासदार म्हणून नाही तर आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून, आमचा भाऊ म्हणून, आम्ही आपल्यावर जीव लावलाय. क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते…’ असं म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Party) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना आर्त हाक दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. या कथित बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या नावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ जारी केला असून गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्त हाक दिली आहे.

Omraje Nimbalkar: सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ‘पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण’ सर्वात महत्त्वाचे

तर दुसरीकडे, ‘मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ‘पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण’ (Pawanraje Nimbalkar Case) सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा महत्त्वाचा निकाल 20 जून रोजी येणार आहे. हा निकाल आल्यानंतरच मी माध्यमांशी संवाद साधून माझी पुढील अधिकृत भूमिका मांडेल. तोपर्यंत मी इतर कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलीय. तसेच ओमराजे निंबाळकर दिल्लीत नसून सध्या आपल्या कुटुंबासह पुण्यातच असल्याची माहिती त्यांनी दिलीय. प्रतिक्रिया समोर आली आहे. 

‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Operation Tiger)

  • 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
  • अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
  • 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
  • 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
  • 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
  • अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
  • नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित 
  • ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर 
  • 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट  
  • 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
  • फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र 
  • 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद 
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र 
  • ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *