Horoscope Today 18 June 2026 : आज गुरुवारचा दिवस 8 राशींसाठी भाग्याचा; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य


Horoscope Today 18 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 18 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. त्यानुसार, आज दत्तगुरुंची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. आज गुरु पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तसेच, आज विनायक चतुर्थी देखील आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा असेल. प्रवास करताना तुम्हाला काही अडचणी उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. तसेच, लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Guru Pushya Yog: तो दिवस आलाच, आज गुरु-पुष्य नक्षत्र – विनायक चतुर्थीचा सर्वात पॉवरफुल योग, 5 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, लक्ष्मी-कुबेराचा हात डोक्यावर, पैसा चुंबकासारखा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *