Ravi Kishan On Sanchita Ugale Death Case: टेलिव्हिजवरची (Television News) प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Actress Sanchita Ugale) हिनं वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं. संचितानं (Sanchita Ugale Suicide Case) उचललेल्या टोकाच्या पावलानं अख्खी इंडस्ट्री हादरली. संचितानं नेमकं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही, पण गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्यानं संचितानं असं टोकाचं पाऊल उचलल्याच्या चर्चा सुरू आहेत. ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) आणि ‘साजन घर’ (Saajan Ghar) या प्रसिद्ध मालिकांमधून संचिता घराघरांत पोहोचली. 14 जून रोजी तिनं नालासोपारा इथल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.
संचितानं उचललेल्या टोकाच्या पावलामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संचिताच्या आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. संचितानं स्वतःच्या हातानंच आयुष्याचा दोर कापला, हसत्या खेळत्या संचितानं असं का केलं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी संचिताला श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच, तिच्या जाण्यानं व्यथित होऊन व्यक्त होत आहेत. अशातच भाजप खासदार आणि अभिनेते रवि किशन यांनीही संचिताच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिलीय. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संचिताच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं असून अलिकडच्या काळातील तरुणांच्या मनाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अभिनेते रवि किशन नेमकं काय म्हणाले? (Ravi Kishan On Sanchita Ugale Death Case)
भाजप खासदार आणि अभिनेते रवि किशन बोलताना म्हणाले की, अलिकडेच आपण एका 22 वर्षीय कलाकाराला गमावले. ही खूप दुःखद घटना आहे… म्हणूनच मेडिटेशन करणं महत्त्वाचं आहे. ध्यानधारणा आणि पूजापाठ या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आपल्याला मानसिक शक्ती आणि ताकद मिळते…”
पुढे बोलताना रवि किशन यांनी म्हटलंय की, “आयुष्यात सुख-दु:ख येतच असतात. जगात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही, जी दुःखी नाही. पण आपल्याला जगायचंय. आत्महत्या हे सर्वात मोठं पाप आहे. त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही…”
रवि किशन यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेले भाजप खासदार रवि किशन राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्याही अत्यंत कुशलपणे सांभाळतात. अलिकडेच ते ‘माँ-बहन’ या माधुरी दीक्षित स्टारर सिनेमात दिसलेले. या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. या सिनेमात रवि किशन यांच्यासोबत ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धरणा दुर्गा यांच्याही भूमिका आहेत. ही डार्क कॉमेडी आणि सस्पेन्स थ्रिलरचा डोस असलेली वेब सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालतेय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष