Sanchita Ugale Death : अभिनेत्री संचिता उगले वयाच्या 22 व्य व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि स्वतःचं जीवन संपवलं. अभिनेत्रीचा मृतदेह हिच्या राहत्या घरी आढळला. संचिता हिच्या निधनानंतर पोलीस संबंधित प्रकरणी चौकशी करत आहे. दरम्यान, संचिता हिच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर तिच्यासोबत असलेल्या आठवणी शेअर करत श्रद्धांजली दिली. पण अभिनेता शीजान खान याने सत्य परिस्थिती सांगितली आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधना पूर्वी आणि निधानंतर परिस्थिती कशी असते.. याबद्दल जीवनातील वास्तव अभिनेत्याने व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे.
संचिता हिच्या निधानानंतर दुःख व्यक्त करत शीजान याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो, ‘कायम व्यक्तीच्या निधनानंतर त्याची आठवण काढली जाते… पण मोठा प्रश्न येथे उपस्थित होतो, जेव्हा ती व्यक्ती आपल्या सोबत होती.. तेव्हा आपण त्या व्यक्तीसाठी किती वेळ काढला… कोणच्या निधनानंतर दुःख व्यक्त करण्यासाठी आपण एक होतो… पण जेव्हा नात्यात दुरावा निर्माण होत असतो. तेव्हा ती नाती कशी टिकवायची याचा प्रयत्न फार कमी लोक करतात…’
शीजान पुढे म्हणतो, ‘माझा तुम्हा सर्वांना एक सरळ प्रश्न आहे.. जेव्हा कोणत्या व्यक्तीचं निधन होतं. विशेषतः कोणत्या तरुण व्यक्तीचं… तेव्हा सोशल मीडियावर एक सारखे पोस्ट पाहायला मिळतात. “मी त्याला फोन करायला हवा होता,” “मी त्याच्यासोबत असायला हवं होतं,” “आम्ही भेटणार होतो,” “हे कसं घडलं?”… प्रत्येक वेळी मला प्रश्न पडतो: ती व्यक्ती जिवंत असताना, खरोखर किती लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? ‘RIP’ च्या पोस्ट्स येण्यापूर्वी आणि ती बातमी समजण्यापूर्वी, गेल्या काही महिन्यांत तुमच्यापासून दुरावत चाललेल्या त्या मित्राला तुम्ही शेवटचा फोन कधी केला होता? किंवा एखाद्याची साधी विचारपूस करण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार कधी घेतला होता?
‘एखादी व्यक्ती निघून गेल्यावर दुःख आणि पश्चात्ताप व्यक्त करणं खूप सोपं असतं. पण ती व्यक्ती जेव्हा तुमच्यासोबत असते, तेव्हा त्यांच्यासाठी वेळ काढणं आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं हे सर्वात कठीण काम असतं. तुम्ही असं शेवटचं कधी केले होते?
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी करु शकलो असतो तर… अशा स्टोरी पोस्ट करण्यापूर्वी स्वतःलाच एक प्रश्न विचारा, माझ्याकडे जेव्हा संधी होती, तेव्हा मी काय केलं. त्या व्यक्तीसोबत मी बोललो का, त्या व्यक्तीची मी विचारपूस केली का?’ सध्या सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.