Munawar Faruqui Supports Pranit More: स्टँट अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमधील ‘370 रुपये बिर्याणी’चा वाद प्रचंड पेटला. यामुळे हिमांशू जांगडा आणि प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान, प्रणितने सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफीही मागितली. या प्रकरणी अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी प्रणित मोरेवर टीका केली. तर, काहींनी समर्थन दर्शवलं. दरम्यान, मुनव्वर फारुकीनं या प्रकरणात उडी घेतली. त्यानं प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. त्यानं सोशल मीडिया वापरकर्त्यांना हे प्रकरण इथेच सोडण्याचा सल्ला दिला आहे.
मुनव्वर फारुकीचा प्रणित मोरेला सपोर्ट (Munawar faruqui Supports Pranit More Said there is limit)
मुनव्वर फारूकीनं सोशल मीडिया वापरकर्त्यांना हा वाद आणखी वाढवू नये, असे आवाहन केले आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर त्यानं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्यानं म्हटलं की, ‘मला असं वाटतं आता हे प्रकरण थांबलं पाहिजे. क्राऊडवर्कमध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. त्या तरुणीने जे काही वक्तव्य केलं, त्याच्याशी मी सहमत नाही. प्रत्येक गोष्टीची एक लेव्हल असते. या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. एकाची नोकरी गेली आहे. करिअर संपल आहे’.
‘समाजातून इज्जत गेली आहे. सगळं काही घडलं आहे. त्यांच्या शब्दांसाठी त्यांना शिक्षा मिळाली आहे. पण आता हे प्रकरण थांबलं पाहिजे. कंटेटच्या नावाखाली त्या लोकांना दाबलं जातंय, आता बस करा भाई…’, असं मुनव्वर म्हणाला. शेवटी तो म्हणाला, ‘त्या लोकांनी जे काही म्हटलंय, त्याची शिक्षा त्यांनी भोगली आहे. इतक्या ट्रोलिंगनंतर जेव्हा कुणाचा मृतदेह समोर येईल, तेव्हा तुम्हाला कदाचित समजेल… बस करा आता. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. कायद्यानुसार त्यांच्यावर जी कारवाई आहे, ती नक्कीच केली जाईल. पण कृपया आता तुम्ही बस करा’, असं त्याने आपल्या व्हिडीओत म्हटलंय.
‘370 रुपये बिर्याणी’चा वाद नेमका आहे तरी काय? (Pranit Mores 370 Biryani Controversy)
प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमधील व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत हिमांशू जांगडाने तरुणीला डेटवर नेल्याचा अनुभव शेअर केला होता. तरुणीला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली. त्या बदल्यात हिमांशूला तरुणीकडून काहीतरी अपेक्षित होते. त्याच्या या कमेंटवरुन सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. हिमांशू आणि प्रणित दोघांनीही व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफी मागितली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष