Arbaz Shaikh Sairaat: ‘सैराट’ सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, ‘मिरवणूकीत मी…’


Arbaz Shaikh On Sairaat: ‘सैराट’ (Sairaat) या सिनेमानं केवळ महाराष्ट्रात नाही तर, सातासमुद्रापार आपला डंका गाजवला. या सिनेमातील प्रत्येक पात्राला विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात रिंकू राजगुरू,  आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख (Arbaz Shaikh) या कलाकारांना विशेष ओळख मिळाली. अरबाज शेख यानं ‘सैराट’ या सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. अलिकडेच अरबाजच्या लग्नातील खास फोटोस सोशल मीडियात व्हायरल झाले होते.   ‘सैराट’ फेम अरबाज सिनेसृष्टीत नेमकं काय करायचा?  हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच त्याच्या चाहत्यांनाही आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत त्यानं ‘सैराट’ सिनेमा करण्यापूर्वीचा एक किस्सा शेअर केला.

‘सैराट’ सिनेमापूर्वी अरबाज शेख नेमकं काय करायचा? (Arbaz Shaikh open Up About Struggle)

अरबाज शेखनं अलिकडेच राजश्री मराठीला मुलाखत  दिली होती. या मुलाखतीत त्यानं ‘सैराट’ सिनेमा करण्यापूर्वीचा किस्सा शेअर केला.  ‘आमच्या गावात पहिले नागराज मंजुळे यांची मिरवणूक निघायची.  मला असं वाटायचं की, त्या मिरवणूकीत मी पण हवा.  कारण नागराज मंजुळे यांची मिरवणूक खूप भारी असायची. संपूर्ण गाव त्यांचं स्वागत करायचं. सगळे खूप आनंदात असायचे. ‘फॅन्ड्री’ सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळेस जेव्हा गावात मिरवणूक निघाली तेव्हा, त्या मिरवणूकीत नाचायला मी देखील होतो’.

‘माझी तेव्हा अशी इच्छा होती की, नागराज सरांसोबत मी पण त्या गाडीत उभा पाहिजे. मला तिथपर्यंत पोहचायचं आहे, असं मी ठरवलं होतं. त्या गोष्टीच्या मागे लागत लागत मी आज इथपर्यंत पोहोचलो. मी ऑडिशन्स दिले. आता मागे वळून पाहिलं तर, असं वाटलं नव्हतं कधी मी एवढं काम  करेन, इतक्या गोष्टी घडतील आपल्यासोबत… पण आता छान वाटतंय. जे काम मिळतंय, ते मी करतोय. मी कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही, प्रत्येक कामाला स्वीकारत आहे.  या सिनेमामुळे आमच्या आयुष्यात एक वेगळाच प्रवास सुरु झाला.  सुरुवातीला असं वाटलं नव्हतं, सैराट इतक्या कोटींचं कलेक्शन करेल, एवढे लोक आम्हाला ओळखतील’.

‘सिनेमा नेमका काय असतो, फिल्मची प्रोसेस कशी असते? हे आम्ही 3 महिन्यांत शिकलो. आता जे आम्ही 3 महिन्यांत शिकलो, ते आम्हाला आता कळतंय’, असं अरबाज म्हणाला.  सिनेइंडस्ट्रीतील 10 वर्षांचा प्रवास नेमका कसा होता?  या प्रश्नावर अरबाज म्हणतो, ‘आयुष्यात चढ उतार असावेत. कारण आपल्याला ज्या गोष्टी मिळतील, त्यात आपल्याला आनंद मिळणार नाही. ‘सैराट’ हा सिनेमा प्रचंड हिट झाला. आम्ही 3 वर्ष काम केलं नाही.  काम न करण्यासाठी काही कारणं देखील आहेत. आता  हळूहळू काम करतोय, खूप आनंद मिळतोय..’, असं अरबाज म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नाही तर शनायाच्या जागी.. गुलाबी साडी फेम अभिनेत्रीला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेसाठी ऑफर, पण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *