Iran War Live Update: इस्रायलने अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार स्वीकारण्यास नकार दिला आहे. संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी असेही म्हटले आहे की, त्यांचे सैन्य दक्षिण लेबनॉनमधून माघार घेणार नाही. लेबनॉन, सीरिया आणि गाझामध्ये स्थापित सुरक्षा क्षेत्रांमध्ये इस्रायली सैन्य अनिश्चित काळासाठी तैनात राहील. दरम्यान, इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्विर यांनी शांतता करारावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले, “आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही. इस्रायल एक स्वतंत्र देश आहे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा करार इस्रायलला लागू होत नाही.”
तर 47 वर्षांनंतर पहिली उच्चस्तरीय बैठक
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घोषणा केली की अमेरिका आणि इराण 19 जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील. असे झाल्यास, 47 वर्षांनंतर तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील ही पहिली उच्चस्तरीय बैठक असेल. स्वाक्षरी करण्यापूर्वी इराणने तीन अटी ठेवल्या इराण-अमेरिका कराराचा संपूर्ण दस्तऐवज अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी म्हटले आहे की, सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सुरू होणारी 60 दिवसांची अमेरिका-इराण चर्चा, अमेरिका प्रथम आपली तीन आश्वासने पूर्ण करते की नाही यावर अवलंबून असेल.
गरीबाबादी यांच्या मते, अमेरिकेने तीन पावले उचलली पाहिजेत:
1. नौदल नाकेबंदी संपवणे,
2. युद्ध आणि सर्व लष्करी कारवाया थांबवणे,
3. इराणचा गोठवलेला निधी मुक्त करणे.
गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी…
- पाकिस्तानी पंतप्रधानांनी सर्वप्रथम युद्धविराम कराराची घोषणा केली. ते म्हणाले की, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाई तात्काळ आणि कायमस्वरूपी थांबवण्यास ते सहमत झाले आहेत.
- ट्रम्प यांनी लेबनॉनमधील बेरूतवर झालेल्या इस्रायली हल्ल्यावर टीका केली. ते म्हणाले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करार अगदी जवळ आला असताना हा हल्ला झाला आहे.
- लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमुळे इराणसोबतच्या शांतता करारावर स्वाक्षरी काही तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
- ओमानच्या किनाऱ्याजवळ संकटात सापडलेल्या भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही विराट-1 या जहाजावरील सर्व 14 भारतीय कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. मस्कतमधील भारतीय दूतावासानेसांगितले की, बचावकार्य यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
- अमेरिकेसोबतच्या संभाव्य कराराला इराणमध्ये तीव्र विरोध आहे. कट्टरपंथी गट, पुराणमतवादी नेते आणि सरकारी माध्यमांमधील काही विभागांचे म्हणणे आहे की, हा करार इराणसाठी शरणागतीचे पाऊल असेल आणि युद्धादरम्यान मिळवलेले यश कमकुवत करेल.
इतर महत्वाच्या बातम्या
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी