माझ्याकडून असे कधीही होणार नाही… मनोज जरांगे पाटील बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, मराठा समाज.. – Marathi News | Manoj Jarange Patil is currently on a tour of Kolhapur and has made a major statement regarding Maratha reservation


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. अंबाबाईचे दर्शन जरांगे यांनी घेतले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. जरांगे पाटील यांनी म्हटले की, लवकर पाऊ पडू दे… बळीराजा सुखी होऊ दे.. बॉम्बे संस्थेचे गॅझेट, सातारा संस्थानाचे गॅझेट, कोल्हापूर, मिरज, आैंध आणि पुणे हे पूर्वीपासून सांगतो की, हे घेतलेच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता काय टप्य्यात टप्प्यात सर्व चाललंय. आता हैद्राबाद गॅझेट झाले. आता ते सातारा संस्थानाचे घेत आहेत. करता करता सर्वच जाणार आहेत. आता कसे असते एखादा विषय एकदम नसतो होत. त्याला अनेक अडचणी अनेक संकटे असतात. त्रासदायकही काही व्यक्ती असतात. आपण तिथेच जाऊ जिथे आपल्याला जायचे आहे. पण जरा टप्प्याने जाऊयात, जरा दमाने. या राज्याचे मी गरीबाचे लेकरू आहे. प्रामाणिकपणे मी लढतोय.

माझ्याकडून असे कधीही होणार नाही की, इकडे आरक्षण दिले तिकडे नाही. राज्यातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही. महाराजांनी हाक द्यावी आणि आम्ही सर्वांनी उभे राहावे. त्यांनी सांगितले की, एकदा यावेच लागेल तर येतो. तब्येत बरी झाली की, महाराजांच्या भेटीला आलोय. सरकारला गॅझेटियलबाबत सद्बुद्धी येई देत , असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. यादरम्यान रोहित पवार यांच्या आंदोलनाबद्दलही बोलताना मनोज जरांगे पाटील दिसले.

मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची पंढरपुरमध्ये जाऊन भेट घेतली. काल रात्री उशिरा रोहित पवार यांनी आपले आंदोलन मागे घेतले. रोहित पवार हे शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यात उपोषणाला बसले होते. पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सातारा गॅझेट घेत आहेत. कोल्हापूरच्या गॅझेटबद्दलची चर्चा आहे. आता महाराजांची भेट घेऊन यात त्यांचे काय म्हणणे आहे यावर चर्चा करून निर्णय घेऊ.

इथून मागे सरकार आम्हाला फसवत गेलं, हे अंतिम सत्य आहे. पण आताच्या काळात थोडा विश्वास बसला आहे. कारण त्यांनी आता चांगली प्रक्रिया केली. जीआर काढणे, शिंदे समितीला मुद्तवाढ देणे. 58 नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करणे, आदेश देणे रोखू नका. हैद्राबाद गॅझेटनुसार त्यांनी एसओपी दिली, त्याबाबतचे आदेश दिले, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *